Congress On Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या रुपाने नीरव मोदी भारतातच! अधीर रंजन चौधरींच्या विधानाने भाजप आक्रमक

Congress Compare Narendra Modi With Nirav Modi देशातील सर्व मुद्द्यांवर बोलणारे मोदी मणिपूरबाबत शांत का ?
Adhir Ranjan Chaudgari, Narendra Modi, Nirav Modi
Adhir Ranjan Chaudgari, Narendra Modi, Nirav ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर तिसऱ्या दिवशी बुधवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. अविश्वास ठरावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत. यावेळी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन यांनी चौधरी यांनी पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली. यामुळे सत्ताधारी पक्षाचे खासदार आक्रमक झाल्याने संसदेत एकच गोंधळ उडाला. (Latest Political News)

अधीर रंजन चौधरींनी मोदी-शाह यांच्यासह सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आपल्या कडक शब्दात त्यांनी संसदेत उपस्थित पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी चिडलेल्या शाहांनाही सडेतोड उत्तर देऊन सभागृहात सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज तीव्र केला. जगातील सर्वात मोठा पक्ष देशाला लुटणाऱ्यांना रोखू शकला नाही, अशी टीका करताना चौधरींनी थेट मोदींवरच निशाणा साधला.

Adhir Ranjan Chaudgari, Narendra Modi, Nirav Modi
Mahua Moitra In Lok Sabha: 6 हजार FIR, 4 हजार घरे बेचिराख, असा हिंसाचार.. ; खासदार मोईत्रांनी डागली तोफ

अधीर रंजन चौधरी म्हणाले, "एकहाती सत्ता असलेल्या 'एनडीए'ला देशाची संपत्ती लुटून गेलेल्या नीरव मोदीला पकडता आले नाही. हातात सत्ता असूनही नीरव मोदीला साधा स्पर्शही करता आला नाही. आपल्या पैशांवर तो कॅरेबियन समुद्रात मजा करताना दिसतो. मला वाटले होते की नीरव मोदी आपले जीवन जगण्यासाठी देश सोडून दूर गेले. पण मणिपूरची घटना पाहून असे वाटते की ते आपल्यातच आहे. मणिपूरचा हिंसाचारावर चेहऱ्यावरची छटाही हलू न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपातच नीरव मोदी आपल्यात बसले आहेत."

पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी करताच संसदेत एकच गदारोळ उडाला. सत्ताधारी खासदारांकडून चौधरींनी आपल्या विधानामुळे माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली. काँग्रेसचे लोक मनाला वाटेल तसे भाष्य करतात असे म्हणत सत्ताधारी खासदारांनी आपल्या खुर्च्या सोडून एका जागी जमा झाले. यानंतरही चौधरींनी काही झाले तरी माफी मागणार नाही, म्हणत मी काही चुकीचे बोललो नाही, असा दावा केला.

Adhir Ranjan Chaudgari, Narendra Modi, Nirav Modi
Nirmala Sitharaman News: लोकांनीच विरोधकांवर दोनदा अविश्वास ठराव आणला; सीतारामनांचा घणाघात

मी कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी बोललो नाही. प्रत्येक मुद्द्यावर बोलणारे मोदी मणिपूरवर काहीही बोलले नाही. भाजपने सत्ताधारी असणारे मणिपूरमधील खासदारांनाही बोलू दिले नाही, असा आरोपही यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या विधानाने संसदसह देशातील राजकीय वातावरण तापणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com