Rahul Gandhi, Eknath Khadse and Shashikant Shinde Sarkarnama
विदर्भ

Rahul Gandhi : राहुल गांधींचा विषय निघताच का भडकले एकनाथ खडसे व शशिकांत शिंदे ?

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Legislative Council News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना आधी दोन वर्षाची शिक्षा सुरत न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. (Prime Minister Narendra Modi was criticized)

सन २०१९च्या निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान ललित मोदी, निरव मोदी यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती. त्यावेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर सर्व चोरांचे आडनाव मोदी का असतं, असा प्रश्‍न राहुल गांधी यांनी करून पुन्हा पंतप्रधान मोदींवर टिका केली होती.

या टीकेनंतर भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. आज दुपारी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्या आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींना निलंबित करता येते. त्याच कायद्याचा वापर आज केंद्रातील भाजप सरकारने केला. यानंतर राज्यातील कॉंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या या कारवाईच्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचा पवित्रा कॉंग्रेस नेत्यांनी घेतला आहे.

सभागृहात आरोग्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी ही माहिती सभागृहात दिली. राहुल गांधींची खासदारकी रद्द केली, असे म्हणताच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला.

राहुल गांधींचा विषय या सभागृहात काढण्याचे प्रयोजन काय. शिक्षा जरी सुनावली तरी त्याच्यावर स्टे येऊ शकतो. औचित्य नाही, संबंध नाही. तरीही हा विषय का काढला असे म्हणत हे कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी या सदनाचे सदस्य नाहीत. ते लोकसभेचे सदस्य आहेत. इथे विषय काढण्याचे काय काम? लोकशाहीचा नवीन पायंडा पहायला मिळतो आहे. एखाद्या व्यक्तीवर टिका केली म्हणून दोन वर्षांची शिक्षा होते. येवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते. हा लोकशाहीचा खून असल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले.

यावेळी सभागृहात गोंधळ सुरूच होता. दरेकरांनी (Pravin Darekar) मांडलेल्या मुद्द्याला पार्श्वभूमी आहे. कारण राहुल गांधी (Rahul Gandhi) १६ दिवस महाराष्ट्रात चालत होते, असे म्हणत उदय सामंत (Uday Samat) यांनी स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण सभागृहात गदारोळ सुरूच होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT