Devendra Fadnavis Rahul Gandhi  sarkarnama
विदर्भ

Devendra Fadanvis News: काँग्रेसच्या राहुल गांधींचा 'मॅचफिक्सिंग'चा गंभीर आरोप; CM फडणवीसांनी मोजक्याच शब्दांत विषय संपवला

Rahul Gandhi News : महाराष्ट्रात भाजप व महायुतीने सरकारी यंत्रणा यांच्यात मॅचफिक्सिंग होती. त्यामुळेच ते निवडणुकीत जिंकून आले. राज्यात अचानक वाढलेली मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा वाढलेला सरासरी टक्का यावरही त्यांचा आक्षेप आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : रोज खोटं बोलले की एक दिवस ते खरे वाटायला लागते. राहुल गांधी नेमके हेच करीत आहेत. ते जोपर्यंत खोटं बोलणे सोडणार नाही तोपर्यंत कधीच जिंकणार नाही. ते जे काही बोलतात ते त्यांनाही माहीत नसते, ऐकणाऱ्यालाही समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागावला.

राहुल गांधी आपल्या एका लेखातून महाराष्ट्रात भाजपने विधानसभा चोरल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात भाजप व महायुतीने सरकारी यंत्रणा यांच्यात मॅचफिक्सिंग होती. त्यामुळेच ते निवडणुकीत जिंकून आले. राज्यात अचानक वाढलेली मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा वाढलेला सरासरी टक्का यावरही त्यांचा आक्षेप आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांवर तुटून पडले आहेत.

विजय वडेट्टीवारांनी भाजपला डिबेटसाठी समोर यावे खुले आव्हान दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांची संख्या प्रत्येकवेळी वाढतच असते असे सांगून राहुल गांधी (Rahul gandhi) यांना पराभवाचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधी यांना थेट खोटारडे ठरवले आहे. त्यांनी बिहार निवडणूक व्हायच्या आधीच हार मानली असल्याचे त्यांच्या लेखातून दिसून येते. ते सध्या जमिनीवर नाहीत. जोपर्यंत खोटं बोलणे आणि आश्वासने देणे सोडणार नाही तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीच निवडणूक जिंकू शकत नाही. त्यांना जागे व्हावे लागले,

निवडणुकीची प्रक्रिया समजून घ्यावी लागले. अशा पद्धतीने खोटं बोलून ते मतदारांचा अपमान करीत आहेत. रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळे त्याच त्या गोष्टी सातत्याने बोलत असतात. यापूर्वीसुद्धा त्यांनी असेच आरोप केले होते.

निवडणूक आयोगाने आकडेवारी सहप्रमाण उत्तर दिले आहे. तरीही त्यांची खोटं बोलण्याची सवय जात नाही. खोटं बोलून स्वतःच्या मनाला समजावत आहेत. मात्र जो पर्यंत ते सत्य स्वीकारत नाही, जमिनीवर काम करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलाही भवितव्य नाही. खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचा काम राहुल गांधी करीत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT