Rahul Gandhi, Latest News
Rahul Gandhi, Latest News Sarkarnama
विदर्भ

सावरकरांवरील 'त्या' विधानानंतर राहुल गांधी नरमले?,भाषणाची आक्रमकता गेली...

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधींची जाहीर सभा आज शेगावमध्ये पार पडली. मात्र या सभेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक शब्दही काढला नाही. त्यांनी जवळपास 26 मिनीटं भाषण केलं. या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी भाजपावर निशाणा साधला. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सावरकरांवरील केलेल्या टीकेवरून राज्यात सुरू असलेल्या वादावर राहुल यांनी शब्दही न काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Rahul Gandhi, Latest News)

राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) दोन दिवसांपूर्वी सावरकरांवर टीका केली होती. त्यावर राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजप (BJP), मनसे व शिंदे गट राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक झाले होते. भाजपच्यावतीने तर राज्यभर आंदोलनं करण्यात आलं. मनसेने (MNS) राहुल गांधींच्या शेगाव येथील सभेत काळे झेंडे दाखण्याचा इशारा दिला होता. मात्र मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिथे पोहचण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे ही सभा विनाअडथळा पार पडली.

दरम्यान, राहुल यांच्याविरोधात राज्यात ठिक-ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील आपली नाराजी व्यक्त करत सावरकरांवरील केलेल्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांच्या या विधानाने मात्र, शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. कॅाग्रेस नेते जयराम रमेश यांनी याविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. आणि महाविकास आघाडीवर काही परिणाम पडणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या झालेल्या या सभेत त्यांनी याप्रकरणी साधा उल्लेखही केला नाही. यामुळे ते नरमल्याच्या चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, काँग्रेसची (Congress)' भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात असून ही यात्रा ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून निघाली होती. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असा प्रवास करत आता पुढे जम्मू-काश्मीर पर्यंत जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT