A small house in Chandrapur’s Ghuggus Taluka listed 119 voters at the same address, highlighting voter list irregularities exposed by Rahul Gandhi’s allegation. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur voter list : एकाच झोपडीतील 119 मतांचे रहस्य उलगडले! पत्ता एकच तरीही मतदार बोगस नाहीत, नेमकं प्रकरण काय?

Chandrapur Voter List Irregularities : काँग्रेस नेते तथा लोकसभेची विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपामुळे देशात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी मतदार याद्यांमधील घोळसुद्धा चव्हाट्यावर आणला आहे.

Rajesh Charpe

Chandrapur News, 13 Aug : काँग्रेस नेते तथा लोकसभेची विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपामुळे देशात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी मतदार याद्यांमधील घोळसुद्धा चव्हाट्यावर आणला आहे.

एकाच घरात 40 ते 100 मतदार कसे? असा सवाल करून त्यांनी निवडणूक आयोगालाही पेचात टाकले आहे. असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यतील घुग्गुस तालुक्यात आढळून आला होता. येथील एका गावातील झोपडीवजा घरात 119 मतदार आढळून आले आहेत.

त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली होती. मतदार यादी तपासली असता यात तथ्य आढळून आले होते. याचा अधिक खोलात जाऊन शोध घेतला असता या मागचे रहस्य उलगडले. हे सर्व मतदार गावातीलच आहेत. तसेच सर्वच मतदार हयात आहेत. मात्र, त्यांचा पत्ता नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याने एकच टाकला असल्याचे समोर आले आहे.

घुग्गुस तालुक्यातील पिंपरी या गावात अरुण मच्छिंद्र कोटवाडे यांचे झोपडीवजा घर आहे. कोटवाडे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचे नावे मतदार यादीत आहेत. कोटवाडे कुटुंबाचा कुठल्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाही. असे असले तरी याच पत्त्याची नोंद असलेली 119 मतदारांची नावे मतदार यादीत आहेत.

राहूल गांधी यांच्या आरोपानंतर हे सर्व बोगस मतदार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. घुग्गुस येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू रेड्डी यांनीसुद्धा आपल्या शहरातील मतदार याद्यांच्या पडताळणी सुरू केली होती. कोटवाडे यांच्या पत्त्यावर 119 मतदारांची नोंदणी केल्याचे त्यांना आढळून आले होते.

त्यांनी येथे बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मत चोरीच्या आरोपांना उधाण आले होते. रेड्डी यांच्या आरोपानंतर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासात रेड्डी यांचे आरोप खरे असल्याचे आढळले. मात्र ते बोगस मतदार नसल्याचेही समोर आले आहे.

हे सर्व मतदार गावातीलच आहेत. फक्त त्यांचा पत्ता संबंधित कर्मचाऱ्याने एकच टाकला असल्याचे आढळून आले आहे. पिंपरी गावात एकूण 1412 मतदार आहेत. गावाचे माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी हे सर्व मतदार गावातीलचअसल्याचे सांगून त्यांचा पत्ता चुकीचा टाकण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT