Congress and Vidhan Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत ‘संविधान खतरेमे‘ हा मुद्दा काँग्रेससाठी चांगलाच फायद्याचा ठरला होता. भाजपने हे नॅरेटिव्ह खोडून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. आता पुन्हा काँग्रेसचे नेते राहूल गांधी पुन्हा संविधानाला उजळणी देणार आहेत. नागपूर येथे ओबीसी युवा मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान संमेलनात ते सहभागी होणार आहेत.
राहूल गांधी(Rahul Gandhi) नागपूरमध्ये संविधानावर बोलणार असल्याने राजकीय धुरळा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल काँग्रेस रेशीमबागेतून फुंकणार असल्याचे या संमेलनातून स्पष्ट झाले आहे.
रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात बुधवारी (ता.६) सकाळी 11 वाजता हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात मनुवाद, संविधान, मनुस्मृती महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये फरक आहे यावर चर्चा होणार आहे. राहूल गांधी उपस्थित राहणार असले तरी हा कार्यक्रम अराजकीय असल्याचे विधान सभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरूच आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी संमेलनाचे आयोजन केले आहे. वडेट्टीवार (Vijay wadettiwar) म्हणाले की, नागपूर येथे होणाऱ्या संविधान संमेलनाचे निमंत्रण राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहे. या संमेलनात विदर्भातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप राजकीय नाही. आचारसंहितेचे पालन करूनच कार्यक्रम होणार आहे, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने संविधानाला धोका असल्याचा खोटा नॅरेटिव्ह पसरवला होता असा भाजपचा आरोप आहे. लोकसभेच्या निवडणुकीत याचा आम्हाला फटका बसल्याचे भाजप नेत्यांनी यापूर्वीच मान्य केले आहे. हा खोटा प्रचार होता हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. तो मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत प्रभावी ठरणार नाही. जनतेला आता खरे खोटे कळाले असल्याचा दावा भाजपने केला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.