Rahul Gandhi News : दिवाळीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर घराचे रंगकाम करताना आणि काही कुंभार कारागिरांना भेटल्याचे व्हिडिओ शेअर केला आहे. घराला रंगकाम करणाऱ्या कारागिरांना राहुल मदत करत असताना दिसून येत आहेत.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचा भाचा रेहान वाड्रा हा घराला रंगकाम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या घराला रंगकाम करतोय ते '10 जनपथ' घर आपल्याला आवडत नसल्याचे राहुल गांधी हे रेहानला सांगितले. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे वडील राजीव गांधी यांचे या घरात वास्तव्य असताना निधन झाल्याने राहुल गांधी रेहानला म्हणाले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी राजीव गांधी यांचे शासकीय निवासस्थान '10 जनपथ' होते.सोनिया गांधी या याच निवासस्थानी राहतात. गेल्या वर्षी राहुल गांधींनी तुघलक लेनमधील आपले निवासस्थान सोडले होते. तेव्हापासून ते आपल्या आई सोनिया यांच्यासोबत '10 जनपथ' येथे राहत आहे.
राहुल गांधी हे कुंभारांच्या घरी देखील गेले. तेथे त्यांनी कुंभारांच्या मदतीने दिवे बनवले. कुंभारांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि कामाची परिस्थिती जाणून घेतली. हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, 'खास लोकांसोबत एक अविस्मरणीय दिवाळी. काही पेंटर बांधवांसोबत काम करून आणि कुंभार कुटुंबासोबत मातीचे दिवे बनवून ही दिवाळी साजरी केली. त्यांच्या कामाचे बारकाईने निरीक्षण केले, त्यांची कौशल्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या.
राहुल गांधी आणि त्यांचा भाचा रेहान यांनी घराला रंगकाम केले.रंगकाम करणाऱ्या कारागिरांनी त्यांना मार्गदर्शन केले. कारागिरांसोबत रंगकाम करताना राहुल गांधी यांच्या डोळ्यात रंग उडाल्याचे तसेच रेहान यांच्या देखील डोळ्यात रंगकाम करताना रंग उडत असल्याचे दिसत आहेत. रंगकाम करताना हाताची आग होती होती याचा अनुभव देखील राहुल यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.