Eknath Shinde, Raju Parve  Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : कत्तलखान्यावरून विदर्भ तापणार; संतापलेले वारकरी आंदोलनाच्या तयारीत...

Raju Parve Meet Chief Minister Eknath Shinde vidarbh : सुप्रीम कोर्टात या विरोधात वकील लावून सर्व संघटनेच्या माध्यमातून तो इथे होणार नाही यासाठी कोर्टात बाजू मांडू असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राजू पारवे यांनी सांगितले.

Rajesh Charpe

Nagpur News : उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखाण्यावरून वातारवरण चांगलच तापले आहे. येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा. अन्यथा विदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला. या परिसरातच नाही तर संपूर्ण विदर्भात कुठेही होऊ कत्तलकाखाना होऊ नये अशीही मागणी वारकरी संप्रदायाचे ओमदेव महाराज यांनी केली आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमरेडचे राजू पारवे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

पवनगाव येथे होणारा कत्तलखाना कोर्टाचा आदेशानंतर उमरेड रोडवरील सुरगाव येथे होत आहे. याला वारकरी संप्रदायाकडून विरोध करण्यात आलेला आहे. याकरिता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीचे अधिकारी यांना सूचना दिल्या. सुप्रीम कोर्टात या विरोधात वकील लावून सर्व संघटनेच्या माध्यमातून तो इथे होणार नाही यासाठी कोर्टात बाजू मांडू असे आश्वासन त्यांनी दिल्याचे राजू पारवे यांनी सांगितले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाची आहे. आम्ही पुढील न्यायालयीन लढाणार आहोत. परंतु वकील नेमण्याची वेळ आमच्यावर आली हे फार दुर्दैवी आहे. हा कत्तलखाना येथे झाला तर सर्वात पहिला बळी माझा असेल असे ओमदेव महाराज चौधरी यांनी सरकाराला ठणकावून सांगितले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उद्या दुसरे मुख्यमंत्री आले तर पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनीच तत्काळ पावले उचलावी असेही महाराज म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर होते. राजू पारवे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर ते प्रथमच मुख्यमंत्र्यांना भेटले. पहिल्या टप्प्यात झालेल्या रामटेकमधील निवडणुकीत शिंदे यांनी सुमारे 10 दिवस प्रचार केला. बाईक रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. मतदारसंघातील प्रमुख मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. काँग्रेसचे (Congress) आमदार राजू पारवे यांच्यासाठी माजी खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT