Maharashtra BSP : बसपाची संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीच बरखास्त; काय आहे कारण?

Maharashtra Political News : बसपाच्यावतीने सर्व प्रदेशाध्यक्षांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्यात येत असल्याचे समजते.
Maharashtra BSP
Maharashtra BSPSarkarnama

Nagpur Political News : लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारूण पराभव त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली आपसातील भांडणामुळे बहुजन समाज पार्टीने संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. त्यामुळे विद्यामान पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कार्यकारिणी बरखास्तीचा आदेश पक्षाने सोमावरी काढला आहे.

पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात बसपाला BSP लोकसभा आणि विधानसभेत अद्यापही खाते उघडता आले नाही. सोशल इंजिनिअरिंगचे अनेक प्रयोग यासाठी करण्यात आले होते. मात्र शेवटपर्यंत यश आले नाही. विदर्भातून बसपाला मोठी अपेक्षा होती. नागपूर महापालिकेत दोन वेळा १० नगरसेवक निवडून आले होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बसपाचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला होता.

नागपूर Nagpur आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बसपाचा उमेदवार कोण राहणार याकडे भाजप आणि काँग्रेसचे लक्ष राहायचे. त्यावरून मतविभाजनाचे गणित मांडले जायचे. आता हासुद्धा धाक संपला आहे. यावेळी बसपाच्या उमेदवारांची चर्चाच झाली नाही.

नागपूर येथे झालेल्या बसपाच्या प्रमुख नेत्या मायावती यांच्या सभेला 15 हजाराचीसुद्धा गर्दी नव्हती. दिवसेंदिवस बसपाची लोकप्रियता घटत चालली असल्याचे यावरून स्पष्ट होते. यात पदाधिकाऱ्यांच्या आपसातील भांडणे, उघउघड केले जाणारे एकमेकांवर आरोपांमुळे यात अधिकच भर पडली आहे.

Maharashtra BSP
Sharad Pawar : 'तुतारी' अन् 'पिपाणी'तला घोळ मिटणार? शरद पवार गटाचं मोठं पाऊल

नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी केंद्राचे पदाधिकारी उपस्थित असताना दोन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली होती. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला होता. या वादाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळाल्याने दोन जणांना निष्कासित करण्यात आले होते. त्यांच्या बचावासाठी जिल्हा प्रमुखानेच पत्रकार परिषद घेतली. तेव्हापासून सुरू झालेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी संपतच नव्हत्या.

मध्यंतरी बसपाचे प्रदेशाध्यक्षांनी हे प्रकार बंद करण्याचा सर्वांना इशारा दिला होता. लेखी पत्र काढून सर्वांना जाहीर तंबी देण्यात आली होती. नागपूर आणि रामटेक लोकसभेत पराभव का झाला याचा अहवाल त्यांनी तयार करून मायावती यांच्याकडे सादर केला होता. कठोर कारवाईचे अधिकार आपण मायावती यांना मागणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

या घडामोडी सुरू असताना संपूर्ण राज्याची कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या पाठिराख्यांना मोठा धक्का बसला आहे. बसपाच्यावतीने सर्व प्रदेशाध्यक्षांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्यात येत असल्याचे समजते. सोबतच विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला आणखी फटका बसू नये याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra BSP
Pune Drug Case : पुण्यातला तो बार 'पतित पावन'ने फोडला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com