Ravikant Tupkar and Raju Shetti Sarkarnama
विदर्भ

Raju Shetti vs Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत बंडखोरी !

Ravikant Tupkar : तुम्हाला तिकडे काय गोंधळ घालायचं तो घाला, पण बुलढाणा जिल्ह्यात मीच लढणार !

सरकारनामा ब्यूरो

फहीम देशमुख

Raju Shetti vs Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा रविकांत तुपकरांची नाराजी अजून दूर झालेली नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना तुपकरांनी आज बुलढाण्यात "तुम्हाला तिकडे काय गोंधळ घालायचा तो घाला, पण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने ठरविले आहे की, ही निवडणूक आपल्याला लढायची आहे !", असे म्हणत तुपकरांनी राजू शेट्टींना गंभीर इशारा दिला आहे.

आज (ता. 15) रोजी बुलढाण्यात निर्धार सभेतून तुपकरांनी हा इशारा दिला आहे. तुपकर भाषणात म्हणले की, कुणी काहीही म्हणू द्या, लोक माझ्या बाबतीत अफवा पसरवतील. यापूर्वी राजू शेट्टींनी भाजपसोबत युती केली म्हाडा आणि हातकणंगलेची जागा घेतली. मला त्यांनी सांगितलं की, बंडखोरी करू नका, तुम्हाला चळवळीसोबत राहायचं आहे. मी त्यांचा आदेश मान्य केला .आमदारकीची तयारी केली आणि ऐनवेळी सांगितलं तुम्हाला जागा सुटणार नाही.

त्यावेळी तुम्ही बंडखोरी करू नका, असे सांगत मला त्यावेळी त्या जागेच्या बदल्यात महामंडळाचे अध्यक्ष केले आणि त्याच्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या लाल दिव्याला लाथ मारून, राजीनामा देऊन मी तुमच्यासोबत पुन्हा देऊन उभा राहिलो. पुन्हा मला राजू शेट्टींनी सांगितलं आणि 2019 च्या लोकसभेची तयारी करायला लावली मात्र ती जागा सुटली नाही. मग म्हणाले, आता ती जागा तुम्हाला मिळणार नाही, त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्ही आमदारकी देणार आहोत. मात्र ते दिलं नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी पक्षाचा आदेश मानत राहिलो आणि नेतृत्वाने म्हटल्यानंतर कधीही बंडखोरी करायची भाषा केली नाही. कारण चळवळ टिकली पाहिजे, अशी भावना माझ्या मनामध्ये होती. पण आता मी अगोदरच सांगितलं की, तुम्हाला तिकडे काय गोंधळ घालायचा तो घाला, पण बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने ठरवलेलं आहे की, ही लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी आपल्याला लढवायची आहे ,असे तुपकर म्हणाले.

रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणातून थेट संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले आहे. शेट्टींच्या संघटनेचा खरा चेहरा आणि आवाज असलेले तुपकरच आता नाराज असल्याने स्वाभिमानीत नवे नाट्य घडू शकते. नाराजीची ही ठिणगी बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वादही निर्माण करू शकते. यामध्ये शेट्टींनी तुपकरांची बाजू घेतली नसल्याने तुपकर नाराज आहेत.

रविकांत तुपकरांनी मागील सहा महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा वापरणे बंद केले आहे. याशिवाय त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या फलकावर राजू शेट्टींचे फोटो नाहीत. त्यामुळे पक्षांतर्गत वादातील ठिणगी ही आधीच पडलेली होती, असे दिसून येते. येत्या निवडणुकीपर्यंत स्वाभिमानींमध्ये आणखी काय काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT