Praful Patel total asset, Praful Patel News, NCP News Updates
Praful Patel total asset, Praful Patel News, NCP News Updates Sarkarnama
विदर्भ

प्रफुल्ल पटेल तब्बल ४१६ कोटी रुपयांचे मालक पण नावावर एकही गाडी नाही!

सरकारनामा ब्युरो

भंडारा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांपैकी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी. कारण त्यांची एकूण संपत्ती आणि त्यात मागील ६ वर्षात झालेली लक्षणीय वाढ. (Praful patel declares assets worth 416 core)

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे तब्बल नवव्यांदा खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. यापूर्वी १९९१, १९९६, १९९८ आणि २००९ असे चार वेळा ते लोकसभेवर तर २०००- ०६, २००६ – ०९, २०१४ – १६, २०१६ – २२ असे ४ वेळेस ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते आता संसदेत नवव्यांदा आणि राज्यसभेवर पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. या काळात प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीमध्ये मागील ६ वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी सन २०१६ मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तेव्हा त्यांची मालमत्ता २५२ कोटींची होती. गेल्या सहा वर्षांत त्यात सुमारे १६४ कोटींची भर पडली असून ती आता ४१६ कोटींच्या घरात गेली आहे. यात २८७ कोटींची स्थावर आणि १२८.५१ कोटींची जंगम मालमत्ता आहे.

सोमवारी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या मालमत्ता विवरणपत्रानुसार पटेल यांची जंगम मालमत्ता १४ कोटी ३६ लाख, तर पत्नीची जंगम मालमत्ता ३४ कोटी १२ लाख आणि एकत्र कुटुंबाची जंगम मालमत्ता ८० कोटींच्या घरात आहे. याशिवाय पटेल यांच्याकडे १ कोटीचे, तर पत्नीकडे ६ कोटी ४४ लाखांचे सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने आहेत.

तर घरे, जमीन, व्यापारी जागा अशी सुमारे ७५ कोटींची स्थावर मालमत्ता प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर तर १०४ कोटी ५६ लाखांची मालमत्ता पत्नीच्या आणि १०७ कोटींची स्थावर मालमत्ता एकत्रित कुटुंबाच्या नावे आहे. विशेष म्हणजे पटेल यांच्या नावावर एकही वाहन नाही. तसेच १४ कोटींचे दायित्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT