राणेंची जीभ पुन्हा घसरली; मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत अन् शिव्यांची लाखोली वाहत टीका

Shivsena | Nitesh Rane : देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फसवलं
Nitesh Rane News, uddhav thackery Latest News
Nitesh Rane News, uddhav thackery Latest Newssarkarnama
Published on
Updated on

सांगली : मागील काही काळापासून शिवसेनेवर (Shivsena) णि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पातळी सातत्याने घसरताना दिसून येत आहे. आधी त्यांच्या जन्मावरुन अक्षेपार्ह टीका, नंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांना उद्देशून केलेली म्याऊ-म्याऊ टीका, यानंतर मिरजमधल्या एका सभेत बोलताना आमदार राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. (Nitesh Rane News in Marathi)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या (BJP Union Minister Narayan Rane) जुहू येथील बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कुठलाही नियम नसताना कारवाई करतात. आताच घरी एक नोटीस दिली आहे. काही लोक क्षणात निर्णय घेतात. पण शिवसेना- राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

Nitesh Rane News, uddhav thackery Latest News
बबनराव ढाकणेंनी भावूक होऊन प्रतापरावांच्या गळ्यात घातला हार : पिता-पुत्रांना झाले अश्रू अनावर

दरम्यान महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्राला पनवती लागून आज अडीच वर्षे झाली आहेत. *** मुख्यमंत्री राज्याला मिळालेला आहे. *** माणसाची अडीच वर्षे झाली. उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना फसवलं. कुठलंही विकासकाम महाराष्ट्रात होत नाही. फक्त लोकांना लुटण्याचा एककलमी कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू आहे, अशी टीकाही आमदार राणे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com