Ramdas Athawale Sarkarnama
विदर्भ

Ramdas Athawale On Grand Alliance: अजित पवारांचे स्वागत, पण महायुतीत आता नवीन भरती नको, कारण...

Dr. Rajendra Gawai : डॉ. राजेंद्र गवई हे सोबत आल्यास त्यांचे स्वागत करू.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Political News : महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपाइं (आठवले गट) यांच्या महायुतीची सरकार सत्तेवर आहे. आता अजित पवारही सरकारमध्ये आले. त्यांचे स्वागत आहे, परंतु आता महायुतीत नवीन पक्षांना प्रवेश नको. आम्हाला मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले. डॉ. राजेंद्र गवई हे सोबत आल्यास त्यांचे स्वागत करू, असेही ते म्हणाले. (If Dr. Rajendra Gavai comes along, we will welcome him)

विरोधी पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत. पराभवानंतर राहुल गांधींनी राजीनामा न देता सत्ताधाऱ्यांचा सामना करायला हवा होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधी पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ नाव दिले. ते योग्य नाही. एका कार्यक्रमानिमित्त (ता. २८) नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आठवले म्हणाले की, विरोधकांनी कितीही आघाडी केली तरी २०२४ च्या निवडणुकीतही पुन्हा मोदीच येतील. ३५० पेक्षा अधिक जागा एनडीएला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिपाइंच्या इतर छोट्या गटांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुलेखा कुंभारे आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले. दलित मुलांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असून पीडितांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भूपेश थूलकर, पूरण मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थूल उपस्थित होते.

लोकसभेत हव्या १२ जागा..

रिपाइंची (आठवले) गटाची ताकद वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन जागांसह देशात १२ जागा हव्या आहेत. महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभेतून आपण स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत. भाजप नेते जे. पी. नड्डा व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. पक्ष विस्तारासाठी जास्त जागा लढवणे आवश्यक आहे. सर्व निवडणुका महायुतीत लढणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांवर कारवाई हवी..

संविधान कुणीही बदलू शकत नाही. त्यात दुरुस्ती करू शकतो, तशी तरतूदच संविधानात आहे. संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई हवी. यासाठी पंतप्रधानांना (Prime Minister) पत्र लिहिणार असल्याचे आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT