Ramdas Athavale on 'INDIA' Alliance : रामदास आठवलेंनी ‘असा’ सांगितला ‘इंडिया’चा पूर्ण अर्थ !

Rahul Gandhi : राहुल गांधींनी ओढून ताणून तयार केली आहे.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSarkarnama
Published on
Updated on

In Yavatmal Ramdas Athavale Told 'INDIA's Meaning : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी आघाडी तयार केली. त्याचे नाव ‘इंडिया’ (INDIA) असे ठेवण्यात आले आहे. त्याचा अर्थ India National Developmental Inclusive Alliance असा आहे. पण शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवलेंनी INDIA चा अर्थ त्यांच्याच पद्धतीने लावला आहे. (Athavale had come to Nagpur to go to Yavatmal)

आज (ता. २२) यवतमाळला जाण्यासाठी आठवले नागपूरला आले होते, तेव्हा विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘इंडिया’ ही नकारात्मक आघाडी आहे. राहुल गांधींनी ओढून ताणून तयार केली आहे. ‘इंडिया’हे नाव चुकीचे आहे. आय म्हणजे इंट्रोडोक्शन, एन - निगेटिव्ह, डी - डेड, आय - आयडिया ए - अलायन्स. अशा आघाडीचा मोदींच्या समोर यांचा टिकाव लागणे अशक्य आहे.

२०२४मध्ये मोदी पंतप्रधान बनतील. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आघाड्या तयार करणे हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. हा प्रयोग त्यांनी जरूर करावा. पण विजय आमचाच होणार, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. मुंबईच्या बैठकीवरून कॉंग्रेस नेते आणि अरविंद केजरीवाल यांच्यात मतभेद आहेत.

कॉंग्रेस नेत्यांनी वक्तव्य केले होते की दिल्लीत आम्ही सरकार आणू. त्यामुळे केजरीवाल मुंबईच्या बैठकीला येतात की नाही, हे अजून निश्‍चित झालेले नाही. ‘इंडिया’ची जी आघाडी आहे. त्यामध्ये केजरीवाल जातील की नाही, हे माहिती नाही. कॉंग्रेसने जर ठरवले की सर्व जण एकत्र मिळून लढू. पण त्यांनीच त्याला छेद दिला असेल, तर केजरीवालांनी ‘इंडिया’मध्ये जाऊ नये, असे आठवले म्हणाले.

Ramdas Athavale
Ramdas Athavale : बाळासाहेबांनी यावे अन् पक्षाचे अध्यक्ष व्हावे, मी मंत्री होईन !

संजय राऊत मुंबईतून लढण्यास इच्छुक आहेत, पण आम्हालाही पुढे जायचे आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाइं प्रत्येक ठिकाणी आहे. आमचा गट जिल्हे, तालुके आणि गावागावांत आहे. नागालॅंडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आले आणि तेथे आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. त्यामुळे आमच्या पक्षाला लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या पाहिजे, असे आठवले म्हणाले.

शिंदे ठाकरेंना सोडून तर अजित पवार शरद पवारांना सोडून आमच्याकडे आले आहेत. आम्ही त्यांना तोडले नाही. पण जे आले त्यांचे महायुतीमध्ये स्वागत आहे. ते त्यांचे आमदार सांभाळू शकले नाहीत, हा त्यांचा दोष आहे.

Ramdas Athavale
Ramdas Athavale : राज ठाकरे चांगले ॲक्टर, पण मी असल्यामुळे ते भाजपसोबत येणार नाहीत !

उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) आम्ही बोलावले होते, पण ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडे गेले आहेत. शरद पवारांनाही (Sharad Pawar) मी बोलावले होते आणि सांगितले होते की मोदी चांगले काम करत आहे. त्यांचे हात मजबूत केले पाहिजे, पण पवारांनी माझा सल्ला ऐकला नाही, असेही रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com