Ramdas Athawale Poetry Sarkarnama
विदर्भ

Ramdas Athawale On Onion Issue: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकतो कांदा, अन् महाविकास आघाडीचा झाला वांदा !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Onion Farmers News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले हे शीघ्रकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. आज (ता. २२) यवतमाळला जाण्यासाठी ते नागपुरात आले होते. साहजिक कांदा प्रश्‍नावर त्यांना पत्रकारांनी छेडले. तेव्हा त्यांनी लगेच एक कविता सादर केली. (Ramdas Athawale is famous as an early poet)

कांद्याच्या संबंधात केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कांद्याचा भाव निश्‍चित असला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि जनतेलाही त्रास होऊ नये, हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

कांद्याचे भाव जनसामान्यांनाही परवडले पाहिजे, असा तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकतो कांदा, अन् महाविकास आघाडीचा झाला वांदा’, ही शीघ्रकवीता त्यांनी यावेळी केली.

लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजपसोबत आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्‍ट्रवादी कॉंग्रेसही आहे. इतरही काही पक्ष महायुतीमध्ये आहेत.

रिपाइंला जर लोकसभेच्या दोन जागा मिळाल्या आणि त्या आम्ही निवडून आणल्या, तर महाराष्ट्रात आमच्या पक्षाला मान्यता मिळणार आहे. यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे पक्ष मोठे आहेत. तुलनेत आमचा रिपाइं छोटा पक्ष असला तरी आमच्याकडे `बॅलेंसींग पॉवर’ आहे, मते आहेत. त्यामुळे आम्हाला योग्य वाटा मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. अशी आमची इच्छा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात अमित शाह (Amit Shah) यांच्याशीही चर्चा करणार आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत (Election) आम्हाला दोन जागा मिळतील. शिर्डीमध्ये मी २००९ मध्ये हरलो होतो. लोकांची इच्छा आहे की, मी तेथून पुन्हा लढावे. त्यामुळे मला तेथे संधी मिळेल अशी अपेक्षा रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी व्यक्त केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT