Chandrapal Chouksey joins the NCP in the presence of Ajit Pawar and Praful Patel, marking a major shift in Ramtek politics. This political development strengthens NCP’s influence in the region. Sarkarnama
विदर्भ

Ramtek politics : काँग्रेसच्या बंडखोराला राष्ट्रवादीचा आश्रय; पर्यटन मित्राने हाती बांधलं 'घड्याळ'

Chandrapal Chouksey joins the NCP : २००४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रपाल चौकसे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडला होता. त्यावरून सर्वच काँग्रेसचे नेते नाराज होते.

Rajesh Charpe

Nagpur News, 14 Nov : रामटेक मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीने आश्रय दिला. याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीसुद्धा बंडखोरी केली होती. मात्र सहा महिन्यांच्या आत त्यांचे निलंबन रद्द केले आणि पुन्हा प्रवेश देऊन संघटनेत मोठे पद दिले.

यामुळे नाराज झालेल्या चंद्रपाल चौकसे यांनी मी काय चूक केली? असा सवाल करून काँग्रेसशी सर्व संबंध तोडून टाकले. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. चंद्रपाल चौकसे यांना पर्यटन मित्र म्हणून ओळखले जाते. रामटेकमध्ये त्यांनी मोठे पर्यटन स्थळ विकसित केले आहे.

रामधाम नावाने परिचित असलेल्या त्यांच्या या स्थळाला दररोज हजारो पर्यटक भेट देत त्यांनी या माध्यमातून रामटेक तालुक्यातील युवकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. याच बळावर त्यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघावर दावेदारी केली होती. २००४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.

मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडला होता. त्यावरून सर्वच काँग्रेसचे नेते नाराज होते. हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी अनेकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी तो सोडण्यास नकार दिला. या मतदारसंघातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांनी चार वेळा भगवा फडकावला आहे. त्यामुळे तो सोडण्यास ठाकरेसेनेचा ठाम नकार होता.

दोन वेळा खासदार असतानाही रामटेक लोकसभा मतदारसंघावर ठाकरेसेनेने काँग्रेसच्या आग्रहामुळे पाणी सोडले होते. त्या बदल्यात नागपूर शहरात दोन आणि ग्रामीणमध्ये दोन विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. यावर शेवटपर्यंत वाटाघाटी सुरू होत्या. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ परत मिळवण्यात काँग्रेसला यश आले. मात्र रामटेक शिवसेनेसाठी सोडावेच लागले आहे. त्यानंतरही काँग्रेसचे नेते स्वस्थ बसले नाहीत.

राजेंद्र मुळक यांनी दावेदारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि इतरही काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी उघडपणे प्रचार केला आणि प्रचासभाही घेतल्या. त्यावरून महाविकास आघाडीत मोठे मतभेद उफाळून आले होते. ठाकरेंच्या नेत्यांनी केदारांना गद्दार असे म्हटले होते.

याची दखल घेऊन राजेंद्र मुळक आणि त्यांच्यासोबतच स्वतंत्रपणे बंडखोरी करणारे चंद्रपाल चौकसे यांनी शेवटी काँग्रेसला निलंबित करावे लागले. मुळक यांची घरपावसी काँग्रेसने करून घेतली मात्र चौकसे यांना वेटिंगवर ठेवले. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत याचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT