Bihar Election Result : 'या' सहा मतदारसंघांवरून अंदाज लागतो बिहारमध्ये 'अब की बार किसकी सरकार'; 1977 पासूनचा अनोखा ट्रेंड

Bihar Election Result 2025 : निकालापूर्वी बिहारमधील त्या सहा मतदारसंघावरून तिथे कुणाचं सरकार येणार याचा अंदाज लावला जात आहे. कारण बिहारमधील सहा मतदारसंघांनी 1977 सालापासून अनोखा पायंडा पाडला आहे. तो म्हणजे या सहा मतदारसंघांवर जो पक्ष किंवा युती जिंकते तेच बिहारमध्ये सत्तेत येतात. त्यामुळे संपूर्ण बिहारचं या मतदारसंघावर लक्ष आहे.
Bihar election counting trends
A visual overview of Bihar election counting trends showing party leads across six decisive constituencies.Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार आणि बिहारमध्ये 'अब की बार किसकी सरकार' येणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून 243 मतदारसंघातील मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

प्राथमिक कलांनुसार सध्या बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि आरजेडी पिछाडीवर आहे. मात्र, अद्याप संपूर्ण मतमोजणी झाली नसल्यामुळे बिहारमध्ये कोणाचं सरकार येणार हे आताचं सांगणं कठीण आहे.

मात्र, निकालापूर्वी बिहारमधील त्या सहा मतदारसंघावरून तिथे कुणाचं सरकार येणार याचा अंदाज लावला जात आहे. कारण बिहारमधील सहा मतदारसंघांनी 1977 सालापासून अनोखा पायंडा पाडला आहे. तो म्हणजे या सहा मतदारसंघांवर जो पक्ष किंवा युती जिंकते तेच बिहारमध्ये सत्तेत येतात. त्यामुळे संपूर्ण बिहारचं या मतदारसंघावर लक्ष आहे.

मात्र, 1977 पासून जरी या मतदारसंघात विजयी होणारे पक्षच सत्तेत असतात असा ट्रेंड असला तरी तो यंदाही खरा ठरणार का हे पाहण्यासाठी आणखी काही तास वाट पहावी लागणार आहे. मात्र, सध्या चर्चेत असणारे हे मतदार संघ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Bihar election counting trends
Bihar Election Result : विजय शिवतारेंचे जावई बिहारमध्ये आमदार होणार? शिवदीप लांडेंच्या मतदारसंघातील कल हाती

ते सहा मतदारसंघ आहेत केवटी, सकरा, सहरसा, मुंगेर, बरबीघा आणि पिपरा या विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघांत जो पक्ष जिंकतो तोच पक्ष बिहारमध्ये सरकार स्थापन करतो असा इतिहास 1977 पासून आहे.

दरभंगा जिल्ह्यातील केवटी मतदारसंघाचा ट्रेंड रेकॉर्ड 100 टक्के सरकार बनवणारा ठरला आहे. 2020 साली इथे भाजपचा विजय झाला होता. तेव्हा जदयूच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाले होते. सहरसा विधानसभा मतदारसंघात विजयी होणारा आमदारही सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो असा ट्रेंड आहे. 2020 मध्ये भाजपचे आलोक रंजन झा येथून विजयी झाले होते.

Bihar election counting trends
Bihar Election Result Live : मोठी बातमी : बिहारमध्ये महाआघाडीचा सुपडासाफ; NDA ची जोरदार मुसंडी...

तर बरबीघा विधानसभा मतदारसंघात जनता पक्षाने 1977 मध्ये ही जागा जिंकली आणि त्यानंतर 2000 पर्यंत काँग्रेस जिंकली. 2020 मध्ये ही जागा जेडीयूकडे गेली. सकरा आणि मुंगेर विधानसभा इतिहासही असाच आहे इथे विजयी झालेल्या पक्षच सत्ताधारी बनला मात्र, 1985 ची विधानसभा निवडणुकीचा निकाल याला अपवाद ठरला. पिपरा विधानसभा मतदारसंघामध्ये 1977 पासून असाच इतिहास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com