Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane
Eknash Shinde, Bhavna Gawli- Krupal Tumane SarkaRNAMA
विदर्भ

Vidarbha Lok Sabha Election Result 2024 Live: शिकारी खुद यहाँ शिकार बन गया! रामटेक यवतमाळमध्ये शिंदे घायाळ

Rajesh Charpe

Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपच्या सांगण्यावरून शिंदे सेनेला रामटेक आणि यमतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलणे चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे. कारण लोकसभा मतमोजणीत सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि यवतमाळ-वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील या सध्या पिछाडीवर आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी सलग दोनवेळा रामटेक जिंकून दिले होते. यवतमाळ मतदारसंघात खासदार भावना गवळी सातत्याने निवडूण येत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर खासदार तुमाने आणि गवळी दोघांनीही शिंदेंची साथ सोडली नाही. त्यामुळे महायुतीमध्ये त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. मात्र भाजपने निवडणुकीपूर्वी (Election) केलेल्या सर्वेक्षणात हे दोन्ही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल दिला होता.

त्यामुळे भाजपने शिंदे सेनेवर दबाव टाकून उमेदवार बदलण्यास भाग पडले. याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागणार असल्याचे दिसत आहे. यवतमाळमध्ये खासदर भावना गवळी यांना डावलून शिंदे सेनेने नांदेड येथून उमेदवार आयात केला. राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्या मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्यांचे पती हिंगोलीचे खासदार होते.

वाटाघाटीत हिंगोली सोडून पाटील यांना यवतमाळमध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे भावना गवळी नाराज होत्या. उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेने संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. ते राज्यात माजी मंत्री होते. याचा चांगलाच फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होताना दिसत आहे. कारण सध्या त्यांनी जवळपास 30 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

रामटेकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावर तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला. भाजपच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत धाडून त्यांना उमेदवार केले. बावनकुळे यांनी पारवे यांच्या विजयाची हमी घेतली आहे. मात्र सध्याचा मतमोजणीचा कल बघता राजू पारवे सुमारे 15 हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे यांची आघाडी वाढत चालली असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे.

(Edited By - Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT