Solapur Lok Sabha Election Result : सोलापुरात उलटफेर; भाजपचे राम सातपुते 6,314 मतांनी आघाडीवर

Lok sabh Election 2024 : दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 64,389 मते मिळाली आहेत, भाजपचे राम सातपुते यांना 47,133 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य हे 17256 एवढे झाले आहे.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama

Solapur, 04 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला असून चौथ्या फेरीत भाजपचे राम सातपुते यांनी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची आघाडी कमी केली. पाचव्या फेरीअखेर भाजपचे राम सातपुते ह्यांनी 6,314 मतांची आघाडी घेतली आहे.

सोलापूर लोकसभा मतमोजणीची पाचवी फेरी पूर्ण झाली आहे. पाचव्या फेरीअखेर भाजपचे राम सातपुते यांना 1,42,700 मते मिळाली आहे. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना 1, लाख 36 हजार 386 मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर राम सातपुते यांना 6,314 मतांची मताधिक्य मिळाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच प्रणिती शिंदे ह्या आघाडीवर होत्या. यात पहिल्या दोन फेरीअखेर प्रणिती शिंदे यांनी 17 हजार 256 मतांनी आघाडी घेतली होती.

पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांना २९४७२ मते मिळाली होती. भाजपचे राम सातपुते यांना २८ हजार २६३ मते मिळाली होती. पहिल्या फेरीअखेर १२०९ मतांनी शिंदे यांनी आघाडी घेतली होती.

Ram Satpute
Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बीडमध्ये बजरंग सोनवणे पाचव्या फेरीअखेर 8000 मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 64,389 मते मिळाली आहेत, भाजपचे राम सातपुते यांना 47,133 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांचे मताधिक्य हे 17256 एवढे झाले आहे. अक्लकोट, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळेवढा आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी मोठा लीड घेतला आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीअखेर विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तरमधूनही प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या.

Ram Satpute
Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 LIVE : माढ्यातून तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील मोहिते पाटील 9000 मतांनी आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com