नागपूर : अनेक जणांच्या मोठ्या संघर्षांनंतर आज बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे धावतेय. पंकजा मुंडे यांनी ज्यांचा उल्लेख केला ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केशरकाकू क्षीरसागर आणि रेल्वे संघर्ष समिती यांच्यापेक्षाही सर्वात जास्त पुढाकार जर कुणी रेल्वेसाठी घेतला असेल, तर गोपीनाथ मुंडे यांनी. आज त्यांचे स्वप्न पूर्ण होतेय, याचा मनस्वी आनंद आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आष्टी येथे आज न्यू आष्टी अहमदनगर (Ahamadnagar) रेल्वेचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस (Devendra Fadanvis) बोलत होते. आज सुरू होत असलेली रेल्वे म्हणजे येथील लोकांचे अनेक दशकांची प्रतीक्षा आहे. आमच्या मनात होते की, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना श्रद्धांजली द्यायची असेल, तर बीड-परळी ही रेल्वे धावली पाहिजे. म्हणून आपलं सरकार आल्यानंतर आपण तो प्रोजेक्ट मुख्यमंत्री (Chief Minister) वॉर रुममध्ये घेतला. त्या वेळी पूर्ण पाच वर्ष दर तीन महिन्यांनी याचा आढावा मी स्वतः घेत होतो. सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. जमिनीचे अधिग्रहणाकरिता जास्त वेळ गेला. तरीही आपण हे काम करवून घेतले आणि निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात या कामाला दिला.
या प्रोजेक्टला मिळालेल्या एकूण निधीपैकी २००० कोटी केंद्र सरकारने दिले. यांपैकी १८०० कोटी एकट्या मोदींनी दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने १४०० कोटी रुपये मिळाले. त्यांतील ११७५ कोटी आपलं सरकार राज्यात असताना मिळालेले आहेत. त्यामुळे मुंडे साहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्याचे काम आम्ही केले. हा प्रकल्प पूर्ण करायचा तर केंद्राने दिलेल्या निधीनंतरही राज्याचा वाटा त्यामध्ये हवा होता. पण यापूर्वीच्या सरकारने शेअरींग करण्यास नकार दिला होता. त्यामुळे हे काम रखडले होते. पण यावर्षी आमचे सरकार आल्यानंतर तात्काळ हा प्रकल्प मार्गी लावल्याचे फडणवीसांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला ऑनलाईन हजर होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही ५० टक्के शेअरींग सुरू केले, जे की यापूर्वीच्या सरकारने बंद केले होते. आज अर्ध स्वप्न पूर्ण होते आहे. पूर्ण त्या दिवशी होईल, ज्या दिवशी ही रेल्वे बीड आणि परळीपर्यंत जाईल. रावसाहेब दानवे हे स्वप्न पूर्ण करतील. कारण आता त्यांना आमचं डबल इंजीन आहे. खासदार प्रितम मुंडे यांनीही यासाठी खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपले सरकार आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्नही आता मिटेल. कारण मुंबईकडे वाहून जाणारे पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यात आणणार आहोत. यानंतर कुठेही मराठवाड्यात दुष्काळ राहणार नाही, असे फडणवीस म्हणाले. आपण येथे कोच फॅक्टरी आणली आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुडे, खासदार सुजय विखे, आमदार रोहिणी, आमदार संग्राम जगताप. आमदार पवार, आमदार सुरेश धस, पल्लवी धोंडे, रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.