'ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवरचा जनतेचा विश्वास'

Chandrashekhar Bawankule : आजचा निकाल म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारचं बुलेट ट्रेन, बावनकुळेंची प्रतिक्रिया.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायतीतील निवडणूकांची (Gram Panchayat Elections) मतमोजणी पूर्ण होऊन आता निकाल हाती आले आहे. निकालामध्ये भाजपने वरचष्मा दिसून येत आहे. यावर आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रियी दिली. 'आजचा निकाल म्हणजे शिंदे - फडणवीस सरकारवर जनतेचा बसलेला विश्वास आहे,' अशा शब्दात बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली.

Chandrashekhar Bawankule
अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंचाचे अभिनंदन करतो. आता पर्यंत आमचे 259 सरपंच आमचे निवडून आले आहे तर एकनाथ शिंदे गटाला 40 जागा आता पर्यंत मिळाले आहे. आजच्या निकालात भाजपने 50 टक्के पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. 'सरपंच थेट जनतेमधून निवडून आला तर तो गावाला उत्तरदायी असतो, मात्र ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेला सरपंच फक्त वॉर्ड पुरता मर्यादित राहतो. म्हणूनच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात थेट जनतेमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचे जनतेने संपूर्णपणे स्वागत केले आहे,' असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

आजचा निकाल म्हणजे हा शिंदे - फडणवीस सरकारवरवरील जनतेचा विश्वास आहे. निकालामध्ये भाजपला नंबर एकवर ठेवून जनतेने शिंदे-फडणवीस सरकारला विश्वास दिला आहे, असेही बावनकुळे म्हणाले. 'आजचा निकाल म्हणजे शिंदे - फडणवीस सरकारचं बुलेट ट्रेन असून, दुसरीकडे महविकास आघाडीची रिक्षा समोर आहे,' अशीही खोचकपणे टीका बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली.

दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. रविवारी (१८ सप्टें) मतदान झालं. आज (सोमवारी) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होऊन, निकाल लागले आहेत. 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल लागले आहेत. त्यापैकी जवळपास 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com