bacchu kadu | ravi rana | navneet rana sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : ऐन विधानसभेपूर्वी बच्चू कडूंनी रवी राणांना दिला ‘440 व्होल्ट’चा झटका

Bacchu Kadu Vs Ravi Rana : बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादानं लोकसभेनंतर मोठं स्वरूप घेतलं आहे. दोघांमधील विस्तव जाता-जात नाही. यातच आता बच्चू कडूंनी थेट रवी राणांच्या विश्वासूला फोडलं आहे.

Akshay Sabale

Amravati News: लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा यांचा पराभव झाला. तेव्हापासून राणा दाम्पत्य आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत असल्याचं पाहत आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना ‘440 व्होल्ट’चा झटका दिला आहे. रवी राणा यांच्या विश्वासूचा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश झाला आहे.

रवी राणा ( Ravi Rana ) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी जिल्ह्याध्यक्ष जितू दुधाने यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात घुसमट होत असल्यानं जितू दुधाने यांनी गुरूवारी राजीनामा दिला होता.

जितू दुधाने हे 17 वर्षांपासून रवी राणा यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून युवा स्वाभिमान पक्षाचं काम करत होते. मात्र, विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी रवी राणा यांना धक्का दिला आहे. त्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

प्रवेशानंतर जितू दुधाने म्हणाले, “मी 17 वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षासोबत काम करत होतो. पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून 15 वर्षे काम केलं. माझ्या वेदना मी चार महिन्यांपासून नेतृत्त्वाकडे मांडण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु, नेतृत्त्वाकडे माझ्या भावना पोहोचविल्या गेल्या नाहीत. माझ्या कार्याची दखल न घेतल्यानं प्रहारमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."”

“मी पक्षात थांबवणार होतो. मात्र, ज्या नेत्याला कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दोन मिनिटे चर्चा करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्या नेतृत्त्वासाठी 17 वर्षे मी दिले आहेत. मी वाईट माणूस असल्याचं आता ते म्हणत आहेत. मी वाईट होतो, तर 17 वर्षे का सोबत ठेवले? सतरा वर्षे जितू दुधाने गोड होता आणि आज दुधाने कडू झाला. आता मात्र तो बच्चू ‘कडू’चा झाला आहे,” असं दुधाने यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT