Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar: प्रसंगी तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढणार; पण घाबरणार नाही

Lok Sabha Election 2024 : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची ठाम भूमिका

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Politics : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विरोधात पोलिसांनी विविध आंदोलनाच्या 23 गुन्ह्यात न्यायालयाने मंजूर केलेला जमीन रद्द करण्याच्या मागणीसाठी धावाधाव करीत आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नांवर बोलताना तुपकर म्हणाले, एक वर्ष नाही दहा वर्षे तुरुंगात टाका, फासावर चढवा. वेळप्रसंगी तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवू.

तुपकरांनी आमदार संजय रायमुलकर यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. रविकांत तुपकरांनी बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधला. तुपकर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आक्रमक आंदोलन तुपकरांकडून करण्यात येते.

काही आंदोलनात तुपकरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी तुपकरांना 23 प्रकरणांमध्ये कोर्टाने जामीन दिला आहे. आता पोलिसांनी हे सर्व जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा न्यायालयात केली आहे. शेतकऱ्यांसाठी झालेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तुपकरांना पोलिसांनी आता सराईत गुन्हेगार असे म्हटले आहे.

यावर बोलताना तुपकर यांनी बुलढाणा पोलिस प्रशासनासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तुपकर म्हणाले, माझ्यावर दाखल असलेले गुन्हे चळवळीचे आणि आंदोलनातील आहेत. ते गुन्हेगारी स्वरूपाचे नाहीत. परंतु पोलिसांनी बुलढाणा न्यायालयात अशी मागणी केली आहे की, माझ्या वरील सगळे गुन्ह्यातील जामीन रद्द करून मला तुरुंगात ठेवा. आपण लोकसभा निवडणुकीची जशी घोषणा केली. तशी काही नेते मंडळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक लढणार असल्यानेच ते अशा पद्धतीचे उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मला एक वर्षासाठी तुरुंगात ठेवण्याचा डाव काही सत्ताधाऱ्यांचा आहे. असल्याचा आरोपही तुपकरांनी केला आहे. मला एक वर्ष नाही दहा वर्ष तुरुंगात टाका. वेळ प्रसंगी फासावर चढवा. परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणे थांबवणार नाही. वेळ प्रसंगी तुरुंगातून निवडणुकीच्या रणांगणात उतरू असा थेट इशाराच तुपकर यांनी विरोधकांना दिला आहे.

दुसरीकडे आमदार संजय रायमूलकर यांना प्रत्युत्तर देताना रविकांत तुपकर म्हणाले, मी मेहकरात रोजच येतो. दर आठवड्याला येतो. ‘डंके की चोट पे’ येतो त्यात काय मोठी गोष्ट आहे. गाडीने येऊन गेलो होतो आम्ही आणि नेहमीच गाडीने येतो. माझी सभा मेहकर मतदार संघात होती. असे बोलत तुपकरांनी रायमुलकर यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT