Farmer Issue : शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन-कापूस प्रश्नावर लढा उभारला आहे. केंद्र व राज्य सरकारला वारंवार वेळ देऊनही ते सोयाबीन कापसाबद्दल बोलायला तयार नसल्याने रविकांत तुपकर यांनी 19 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे. तुपकर हे रात्रीपासूनच भूमिगत झाले आहेत. त्यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. विदर्भातील नगदी पीक असलेले सोयाबीन आणि कापूस या पिकांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांनी आंदोलन उभारले आहे.
एल्गार मोर्चा, विधान भवनावर मोर्चा, केंद्रीयमंत्री पीयूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अद्यापही यावर तोडगा निघत नसल्याने रविकांत तुपकर यांनी आता रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. 19 जानेवारी रोजी मुंबई, गुजरातकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रोखू, असा इशारा दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव लोहमार्ग पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे रात्रीपासून पोलिस तुपकरांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या नोटिसांची आपल्याला सवय आहे. अशा नोटिसांना आपण भीक घालत नसल्याचे म्हणत आंदोलन होणारच, असे तुपकरांनी म्हटले आहे. त्यामुळे रात्रीपासून रविकांत तुपकर हे भूमिगत झाले आहेत. त्यांच्या बुलढाणा येथील घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यापूर्वीही तुपकर यांच्या घरासमोर बंदोबस्त लावून तुपकर यांना अटक करण्यात आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अटक बेकायदा असल्याचे म्हणत न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. आता पुन्हा रेल्वे रोको आंदोलनाच्या पूर्वी पोलिस ‘अलर्ट मोड’वर असून तुपकर यांना पुन्हा अटक होते का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी केली. मात्र कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन त्यांनी चालूच ठेवले. इकडे लोकसभा निवडणुकीची तयारी तुपकरांकडून केली जात आहे. तिकडे आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला आहे. राजकारणापेक्षा आंदोलन आणि सामाजिक लढा हाच तुपकरांचा पिंड आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.