Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Ravikant Tupkar News : पोलिस म्हणतात रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करा, चार जुलैला सुनावणी !

Agitation : रविकांत तुपकर सातत्याने आंदोलन करीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Ravikant Tupkar staged a self-immolation protest : रविकांत तुपकरांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे रविकांत तुपकर यांना आत्मदहन आंदोलनप्रकरणी देण्यात आलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. (The Buldhana city police requested the court to cancel the bail of Tupkar)

ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आज (ता. २६) न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. याप्रकरणी आपली बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने रविकांत तुपकर यांना दिली. त्यासाठी पुढील सुनावणी चार जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष चार जुलैच्या सुनावणीकडे लागले आहे.

सोयाबीन - कापसाला दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने आंदोलन करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला विराट एलगार मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन त्यांनी अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली.

११ फेब्रुवारी रोजी त्यांनी आत्मदहन आंदोलन केले. हे आंदोलन चांगलेच चिघळले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला होता. यानंतर तुपकरांसह त्यांच्या ३६ सहकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करत तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने रविकांत तुपकर व इतर आंदोलकांची जामिनावर सुटका केली होती.

त्यानंतरही सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे पीकविमा, अतिवृष्टीची व सततच्या पावसाची नुकसान भरपाई तातडीने जमा करण्याच्या संदर्भात कृती न केल्याने तुपकरांनी १६ जून रोजी मुंबईत पीकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्यावरून शेतकऱ्यांसह उड्या घेण्याचा इशारा दिला होता. या होणाऱ्या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवरदेखील पोलिसांनी तुपकरांना नोटीस दिली होती.

रविकांत तुपकरांना १४ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रशासनाने मध्यस्थी करत पीकविमा कंपनीशी तुपकरांची चर्चा घडवून आणली आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. दरम्यान आता बुलढाणा शहर पोलिसांनी पुन्हा तुपकरांच्या विरोधात भूमिका घेत त्यांना आत्मदहन आंदोलन प्रकरणात देण्यात आलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी न्यायालयात केली आहे.

बुलढाणा (Buldhana) शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी जिल्हा न्यायालयाकडे १४ जून रोजी अर्ज दाखल केला होता. या अर्जाविरुद्ध कारण दाखविण्यासाठी २६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने रविकांत तुपकरांना दिले होते. दरम्यान याप्रकरणी आज रविकांत तुपकरांच्या वतीने ॲड. शर्वरी सावजी-तुपकर न्यायालयात हजर झाल्या.

रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना आपली बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने दिली असून त्यासाठी चार जुलै ही पुढील तारीख देण्यात आली आहे. आता चार जुलै रोजी रविकांत तुपकर काय बाजू मांडतात आणि न्यायालय (Court) त्यांची बाजू ग्राह्य धरते की नाही, हे सुनावनीनंतरच कळणार आहे. तूर्तास तरी चार जुलैच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार असून आता सर्वांच्याच नजरा या सुनावणीकडे लागलेल्या आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT