Ravikant Tupkar News : प्रत्येकवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, पण तुमच्या एकजुटीने १० हत्तींचं बळ मिळालं !

Agitation : अतिवृष्टीची मदत मिळाल्याने आंदोलन यशस्वी झाले.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Slways fighting for the interests of farmers : शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कायम लढा देत आहोत. शेतकऱ्यांचे प्रत्येक वेळी मोठे पाठबळ मिळते. त्यामुळेच आपण हा लढा लढू शकतो. आंदोलनाचे यश शेतकऱ्यांच्या आनंदात आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि कुटुंबाला सुखाचे दिवस हेच आंदोलनाचे खरे उद्दिष्ट आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले. (The ruling party is suppressing the farmers' movement)

शेतकऱ्यांना पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथे तुपकरांचा काल (ता. १६) रोजी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विनायक सरनाईक, नितीन राजपूत, ॲड. राज शेख, मोहम्मद अजहर, रामेश्वर अंभोरे, सुरेश ढोणे, भारत जोगदंडे, प्रशांत डोंगरदिवे, राजू जवंजाळ, अशोक सुरडकर, अनिल चव्हाण, रविराज टाले, पवन चव्हाण आदी उपस्थित होते.

आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा व अतिवृष्टीची मदत मिळाल्याने आंदोलन यशस्वी झाले. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि शेतकरी चळवळ दडपण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांसाठी पोलीस कारवाईला सामोरे जात आपण आंदोलनाची भूमिका कायम ठेवली.

सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलनाच्या जोरावर आपण शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पाडू शकलो याचा आनंद आहे. गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे मला व माझ्या सहकाऱ्यांना पुढच्या लढ्यासाठी दहा हत्तीचं बळ मिळालं, असेही यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

१३ कोटी ३९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..

रविकांत तुपकरांच्या मुंबई येथे १६ जून रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा धसका विमा कंपन्यांनी घेतला. पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५६ कोटी ७५ लाख रुपये जमा केले.

संपूर्ण पैसे जमा होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका तुपकरांनी घेतली होती. त्यानंतर कृषी अधीक्षकांनी पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते व काल उर्वरित ७ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ३९ लाख रुपये जमा झाले, हे तुपकरांच्या (Ravikant Tupkar) आंदोलनाचे यश आहे.

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक हजारपेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची (Farmers) संख्या मोठी आहे, त्या शेतकऱ्यांना सन्मानजनक रक्कम, उशिरा तक्रारी केल्याच्या नावाखाली अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना व त्रुटीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळण्यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे तुपकरांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com