Ravindra Bhoyar
Ravindra Bhoyar Sarkarnama
विदर्भ

काँग्रेसने साथ सोडलेले रवींद्र भोयर एकटेच मतदानाला आले!

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत काँग्रेसचे (congress) अधिकृत उमेदवार असलेले आणि शेवटच्या काही दिवसांत काँग्रेसने साथ साडलेले रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) सकाळी एकटेच मतदानाला पोचले. दुसरीकडे काँग्रेसच्या मतदारांनी गटागटाने मतदान केल्याने भोयर एकटे पडल्याचे स्पष्ट झाले. (... and Ravindra Bhoyar reached the polling station alone!)

काँग्रेस पक्षाने शेवटच्या क्षणी पाठिंबा काढून घेतल्याने रवींद्र भोयर हे मतदानाला येणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, काँग्रेसतर्फे ते सर्वात आधी मतदान केंद्रात दाखल झाले. यावेळी आपण एकटेच का आला, अशी विचारणा केली असताना सर्व मतदार १० वाजता येणार असल्याचे सांगितले. तशी सूचना काँग्रेसने आपणास दिली होती. त्यानुसार आपण वेळेवर आलो. बाकीचे येतच आहेत, असेही भोयर म्हणाले.

काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर केले असले तरी आपण नाराज नाही. तो पक्षाचा निर्णय आहे, मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे. मात्र, आपण निवडणूक लढण्यास असमर्थ होतो, याचा त्यांनी पुन्हा एकदा इन्कार केला.

ते गोपनीयतेचा भंग ठरेल !

रवींद्र भोयर यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आपण निवडणूक लढवण्यासाठी असमर्थ नव्हतो. काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला असला तरी भोयर यांनी आपण काँग्रेस सोबतच असल्याचे सांगितले. मत कोणाला दिले हे सांगणे गोपनीयतेचा भंग ठरेल, असे सांगून त्यांनी आपण काँग्रेसला मतदान केल्याचे स्पष्ट केले. भोयर स्वतः काँग्रेसचे उमेदवार असल्याने त्यांनी कोणाला मत दिले, हे निकालाअंतीच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT