बाजी कोण मारणार बावनकुळे की देशमुख? : नागपुरात ९९ टक्के मतदान

नाट्यमय घडामोडीनंतर नागपुरात काँग्रेसने आपला उमेदवार मतदानाच्या आदल्या दिवशी बदलला आहे.
Mangesh Deshmukh-Chandrasekhar Bavankule
Mangesh Deshmukh-Chandrasekhar BavankuleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) आणि काँग्रेसने (Congress) मतदानाच्या एक दिवस अगोदर पाठिंबा जाहीर केलेले उमेदवार मंगेश देशमुख (mangesh deshmukh) यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी येत्या मंगळवारी (ता. १४ डिसेंबर) होणार असून मतदारांचा कौल कुणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना किती मते पडतात, हेही निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. (99% turnout for Nagpur Legislative Council)

नागपुरातील एकूण ५५९ नगरसेवकांपैकी ५५४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, पाच जणांनी मतदान केले नाही. यात बसप आणि एमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे कळते. विधान परिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बदलले. त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना ऐनवेळी पाठिंबा जाहीर केला.

Mangesh Deshmukh-Chandrasekhar Bavankule
आमदार प्रणिती शिंदेंना वाढदिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचा धक्का!

काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक गटागटानेच मतदानाला आले. दुपारी दोनपर्यंत सुमारे ८० टक्के मतदान आटोपले होते. सकाळी ८ पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. भाजप आणि काँग्रेसचे मतदान गटाटाने मतदान केंद्रात दाखल झाले. भाजपने आपल्या मतदारांना पेंच येथून बसने थेट स्वागत लॉन येथे आणले होते. तेथून चारचाकीने ते जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानाला घेऊन गेले. काँग्रेसचे मतदार सदर येथील तुली इंटरनॅशनल आणि रामदास पेठेतील सेंटर पॉइंट येथून मतदानाला गेले.

Mangesh Deshmukh-Chandrasekhar Bavankule
आमदार मोहितेंना मोकळं सोडायचं की रोखून धरायचं, हे भाजपवर अवलंबून!

मतदानाकडे पाठ फिरवणारे बसपचे नगरसेवक नागपूर महापालिका आणि कामठी महादुल्यातील एमआयएमचा एक नगरसेवक असल्याचे सांगण्यात येते. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडली. जिल्हाधिकारी आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार राहुल सारंग, सूर्यकांत पाटील यांचे संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष घातले.

Mangesh Deshmukh-Chandrasekhar Bavankule
विरोधकांनी माघार घेतली; पण भावानेच ठोकला शड्डू!

पोलिसांनीच केले मतदारांची ओळख पटवण्याचे काम

मतदान केंद्राबाहेरच मतदारांची ओळख पटवण्यात येत होती. मतदारांची यादी ही पोलिस कर्मचाऱ्यांकडे होती. येथे निवडणूक विभाग विभागाचा एकही कर्मचारी नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com