Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Thackeray Review Meeting: वर्धा, रामटेक, यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी ठाकरे आखणार रणनीती ? गुरुवारी बोलावली आढावा बैठक

Shivsena Uddhav Thackeray Group: या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही आदेशही ते देणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या लोकसभानिहाय मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता गुरुवारी वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही आदेशही ते देणार आहेत.

शिंदे गटात गेलेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी तसेच रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी ठाकरे रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. एवढंच नाही तर या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची ठाकरे चाचपणी देखील करत असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवरच गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक बोलावली असून या बैठकीसाठी या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात, ते पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच शिंदे गटात गेलेल्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी ठाकरे कोणती रणनीती आखतात हे उद्याच्या बैठकीनंतर समजणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT