Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Amravati Politics News: साहेब तुम्ही उमेदवार द्या, आम्ही जिंकून आणू; ठाकरेंना अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांचा शब्द

Shivsena Uddhav Thackeray Group: उद्धव ठाकरेंनी अकोला, बुलडाणा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
Published on

Mumbai News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी अकोला, बुलडाणा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत शिवसैनिकांनाही कानमंत्र दिला.

ठाकरे गटाच्या अमरावती जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना शब्द देत ''साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही जिंकून आणू'', अशी ग्वाही दिली.

Uddhav Thackeray
Buldhana Politics News: प्रतापराव जाधवांना ठाकरे शिकवणार धडा ? बुलडाणा लोकसभेसाठी लावली 'फिल्डिंग'

ठाकरेंनीही शिवसैनिकांना शब्द देत महाविकास आघाडीमध्ये आपण अमरावती मतदारसंघ आपल्याकडे (ठाकरे गटाकडे) घेऊ, तुम्ही आतापासूनच तयारी करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

"अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करा, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार जिंकून आला पाहिजे", असे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Uddhav Thackeray
Akola Politics News: अकोला लोकसभेसाठी 'वंचित'सोबत युती किती फायद्याची ठरेल ? ठाकरेंनी घेतला कानोसा

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही लोकसभेसाठी रणनीती आखण्यात येत आहे. मंगळवारी ठाकरेंनी अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com