Rohit Pawar Sarkarnama
विदर्भ

Rohit Pawar : ...अन् रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा शेवटही झाला संघर्षानेच!

Amar Ghatare

Nagpur News : गेल्या 30 दिवसापासून रोहित पवार यांनी पुण्यावरून सुरू केलेली संघर्ष यात्रा नागपूर येथे पोहोचल्यानंतर शेवट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.मात्र, सर्व नेत्यांची भाषणे झाल्याबद्दल जोपर्यंत आमचं निवेदन घेण्यासाठी मंत्रिमंडळातील कोणी मंत्री येत नाही. तोपर्यंत आम्ही इथून उठला नाही नाहीत. आम्ही स्वतः विधान भवनावर कार्यकर्त्यांसह जाऊ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

मात्र, मंत्रिमंडळातील कोणीही मंत्री न आल्यामुळे रोहित पवार (Rohit Pawar) आणि त्यांचे कार्यकर्ते हेच विधानभवनावर चाल करत निघाले असताना पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं व त्यानंतर पोलिस आणि रोहित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.व त्यानंतर रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

राज्यात बेरोजगारी, नापिकी, दुष्काळ,शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न यासह रोहित पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून दहा जिल्ह्यातून आपली संघर्ष यात्रा सुरू केली. त्या संघर्षात्रेमध्ये त्यांनी तरुण शेतकरी, शेतमजूर,व्यावसायिक या सर्वांशी संवाद साधला व त्यांचे संपूर्ण प्रश्न ऐकून घेतले ते संपूर्ण प्रश्न सरकार दरबारी नेण्याकरता मंगळवारीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून थेट विधान भवनावर त्यांनी मोर्चा काढला.

त्यानंतर नेत्यांची संपूर्ण भाषण होईपर्यंत मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी यावं असा आग्रह रोहित पवार आणि धरला होता. जर आमचे निवेदन घेण्यासाठी कोणी मंत्री आले नाही तर आम्ही स्वतः विधान भवनावर जाऊ असा इशारा त्यांनी दिल्यानंतर कोणीही मंत्री आले नाही.त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या समर्थकांसह विधानभवनावर चाल केली व त्यानंतर पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं व त्यानंतर पोलीस व रोहित पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. (Yuva Sangharsha Yatra)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरशः जबरदस्तीने उचलून नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं, तर रोहित पवार ,रोहित पाटील यासह अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष दिसून आला.आता संपूर्ण कार्यकर्ते व रोहित पवार हे पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई केली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT