RSS news update
RSS news update sarkarnama
विदर्भ

RSS कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी लिंब टाकलीत का तपासा ? ; असं ठाकरे भागवतांना का म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray Criticizes : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून डॉ. हेडगेवारांना अभिवादन करण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत यावर टीका केली. शिंदे-फडणवीस सरकार, दिशा सॅलियन, हिवाळी अधिवेशनातील विषय यावर टीका ठाकरेंनी टीका केली.

ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वृत्ती घाणेरडी आहे, आज त्यांनी आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे मोहन भागवतांनी काळजी घ्यावी. भागवतांनी कार्यालय कुठं लिंब पडली आहेत का, ते पाहावं,"

ठाकरे म्हणाले, ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. त्यांचे राजीनामे सरकार घेणार आहे का, की आरोप झाल्यानंतर फक्त क्लिनचीट देणार आहेत. काल मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयात मिंघे गट (शिंदे गट) गेला होता. ज्यांच्यात काही करण्याची हिमंत नसते, ते दुसऱ्याचे कार्यालये, पक्ष, नेते चोरतात," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात बुधवारी एकच राडा झाला. शिवसेनेच्या दोन्ही गटाने शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. पोलिस आणि मुंबई महापालिकेच कर्मचारी यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील तणाव निवळला. पण शिंदे गटाने या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे.

बुधवारी पक्ष कार्यालयावर शिंदेगटाने ताबा मिळवल्यानंतर शिंदेगटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जिथे आवश्यकता आहे महाराष्ट्रात तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि आम्ही ताबा मिळणार!”, असं भरत गोगावले म्हणालेत.

भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज नागपुरात टीका केली आहे. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा!, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”, असंही नितेश राणे म्हणालेत. खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT