Uddhav Thackeray on Shinde: शिंदे यांच्यात हिंमत नाही, ते फक्त पक्ष, कार्यालय, नेते चोरतात..! ; ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray News: हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला,"असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकार, दिशा सॅलियन, हिवाळी अधिवेशनातील विषय यावर टीका केली. "राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला,"असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. त्यांचे राजीनामे सरकार घेणार आहे का, की आरोप झाल्यानंतर फक्त क्लिनचीट देणार आहेत. काल मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयात मिंघे गट (शिंदे गट) गेला होता. ज्यांच्यात काही करण्याची हिमंत नसते, ते दुसऱ्याचे कार्यालये, पक्ष, नेते चोरतात," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Shiv Sena Bhavan : उद्धव ठाकरे लवकरच शिवसेना भवनाची चावी मुख्यमंत्र्यांना देणार ?

शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात बुधवारी एकच राडा झाला. शिवसेनेच्या दोन्ही गटाने शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. पोलिस आणि मुंबई महापालिकेच कर्मचारी यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील तणाव निवळला. पण शिंदे गटाने या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे.

बुधवारी पक्ष कार्यालयावर शिंदेगटाने ताबा मिळवल्यानंतर शिंदेगटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “जिथे आवश्यकता आहे महाराष्ट्रात तिथे-तिथे शिवसेना कार्यालयावर जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि आम्ही ताबा मिळणार!”, असं भरत गोगावले म्हणालेत.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Winter Session 2022 : अधिवेशनात 'या' दोन विषयावर एकही प्रश्न विचारला नाही ; शिवसंग्रामची खंत

भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज नागपुरात टीका केली आहे. वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा!, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “ठाकरेगट म्हणजे दोस्ताना पार्ट 3!”, असंही नितेश राणे म्हणालेत. खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

"संजय राऊत याचा वरचा भाग सटकलेला आहे. आपल्या नागपूर किंवा राज्यात वेड्यांचं रुग्णालय असेल तिथे संजय राऊत यांना ठेवा. त्यांची थर्टी फस्टची पार्टी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये व्हायला हवी," असंही नितेश राणे म्हणाले.

राणे म्हणाले, "मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावरून काल राडा झाला. शिंदेगटाने या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यावरही नितेश राणे बोलले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे. त्यांचा अधिकार ते घेणारच. जे बाळासाहेबांचं आहे ते सर्व शिंदेचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला पाहिजे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com