Mohan Bhagwat Sarkarnama
विदर्भ

Mohan Bhagwat Statement: सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान; म्हणाले,'मला अलीकडे तिकीट मागणाऱ्यांचीच भीती वाटते..!'

RSS News: सध्या एआयचा जमाना आहे. भारत नंबर वनचा देश होत असल्याने अमेरिका, चीन चिंतेत आहे. भारत शिरजोर होणार यासाठी खटाटोप केला जात आहे. पण भारताची भौतिक ताकद मोठी आहे.

Rajesh Charpe

Nagpur News: देवभक्ती आणि देशभक्ती थोडी वेगवेगळी दिसते पण भारतात हे दोन्ही शब्द वेगवेगळे नाहीत. जो देशभक्ती करतो त्याच्याकडून आपसूकच देवभक्ती घडते. मात्र अलीकडे थोडी सेवा केल्यावर मेवा मागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. समाज माध्यमांवर फोटो टाकून मिरवण्याची वृत्तीही वाढली आहे ,असा टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लगावला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी याचवेळी मला पुढे चालून निवडणुकीचे तिकीट तर मागणार नाही, अशी भीती वाटायला लागली असल्याची मिश्किल टिप्पणी तथाकथित सेवेकऱ्यांना लागवला आहे. यावेळी भागवत यांनी उपस्थितांना नि:स्वार्थ सेवा करण्याचा सल्लाही दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुद्रपुजेचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले आहे. यावेळी सरसंघचालक बोलत होते. ते म्हणाले, आपल्यात शिवत्व जागवण्यासाठी कामी लागल्यास, आपले मंगल होईल. सोबतच जगाचे मंगल होईल. श्री श्री रविशंकर यांच्यासारखे गुरू आपल्याला मार्ग दाखवतील. काहीही केले नसते तरी उद्या ७५ वर्षांचा झालोच असतो. पण किती वर्षे जगलो त्यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे

'जे आपल्यात आहे ते सर्वात आहे. आपला आपसात संबंध आहे, करार नाही. मुलांना आपण सेवा करावे म्हणून शिकवत नाही, कारण ते आपले आहे. जीवन आपलेपणाच्या आधारावर चालते. आज जग यासाठी तळमळत आहे. जो बलवान आहे, तो जगेल आणि दुर्बल आहे तो मरणार आहे. आज सर्वच सोयीसुविधा व तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध आहे. परंतु संतोष, समाधान नाही. विकास झाला, पण पर्यावरण खराब झाले. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शिवाकडे असल्याचं विधानही भागवत यांनी आपल्या भाषणातून केलं.

सरसंघचालक भागवत म्हणाले, शिव सर्वत्र आहे. रावणाच्या लंकेत जाण्यासाठी रामाने सेतू बांधण्यापूर्वी शिवजीची पूजा केली होती. शिवभक्ती करतो म्हणजे त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती पूजा ठरते. हीच वास्तविक पूजा आहे. त्याग आणि सेवेचे आदर्श शिवजी आहे. विश्व कल्याण करणे म्हणजे उपकार करणे होत नाही.

ओबामा बोलत असल्याचा व्हिडीओ पहिला. तो खरा आहे की नाही माहीत नाही. सध्या एआयचा जमाना आहे. भारत नंबरवनचा देश होत असल्याने अमेरिका, चीन चिंतेत आहे. भारत शिरजोर होणार यासाठी खटाटोप केला जात आहे. भारताची भौतिक ताकद मोठी आहे. भारतीय गुणवान आणि कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे भारतासोबत अॅडजेसमेंट करता यावे अशी चिंता इतर देश करत असल्याचे कौतुकोद्गारही मोहन भागवत यांनी यावेळी काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT