BJP-RSS Sarkarnama
विदर्भ

RSS-BJP Election Strategy : लोकसभेत भाजपला फटका बसला; विधानसभेला मदतीला ‘संघ’ धावला!

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून भाजपकडून नव्याने डावपेच आखले जात आहेत. त्या दृष्टीकोनातूनच नागपुरात काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 27 August : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून विधानसभेला पुन्हा एकदा विजयरथ पूर्वपदावर आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपच्या मदतीला असणार आहे. त्यातूनच मतदासंघातील समन्वयासाठी संघाकडून ‘समन्वयका’ची नेमणूक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) परिवारातील विविध संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे भाजप ठरविण्यात आलेले टार्गेट पूर्ण करू शकला नव्हता.

महाराष्ट्रातून भाजपला महायुतीमधील दोन पक्षांच्या माध्यमातून लोकसभेच्या अधिक जागांची अपेक्षा होती. मात्र, भाजपच्याच जागा घटल्यामुळे महायुती टार्गेटपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून भाजपकडून नव्याने डावपेच आखले जात आहेत. त्या दृष्टीकोनातूनच नागपुरात काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. विदर्भ प्रांतातील संघ परिवारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती.

त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका आणि विधानसभा निवडणुकीसाठी करायची तयारी याबाबत चर्चा झाली होती. त्या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘समन्वयक’ नेमण्याची प्राथमिक चर्चा झाली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत संघ परिवारातील विविध संघटना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आगाम निवडणुकीत भाजप आणि संघ परिवारात सुसंवाद असावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक समन्वयक नेमण्याबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत त्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानुसार संघाकडून समनव्यक नेमण्यास सुरुवात झाली आहे.

भाजपबरोबर समन्वय राहावा, यासाठी संघाचे जुने जाणते स्वयंसेवक, विस्तारक आणि पूर्ण काळ प्रचारक म्हणून काम केलेल्या स्वयंसेवकांचा समावेश आगामी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान समन्वयक म्हणून करण्यात येणार आहे. हे समन्वयक प्रचाराच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना सूचना आणि सल्ला देण्याचे काम करू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT