Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारच्या वतीने भाजप नेत्याने मागितली जाहीर माफी

BJP Leader Ashish Shelar apologized : नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (ता. 26 ऑगस्ट) कोसळला, त्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे.
Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 27 August : नौदल दिनानिमित्त मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (ता. 26 ऑगस्ट) कोसळला, त्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे. राजकीय पक्षात मात्र आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या वतीने राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे. मला या घटनेवर कुठलेही राजकीय भाष्य करायचे नाही; पण जी घटना घडली, ती दुर्दैवी, क्लेषदायक आणि मनाला वेदना देणारी आहे, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. राजकोट येथे उभारण्यात आलेला 35 फूट उंचीचा महाराजांचा पुतळा होता. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला हा पुतळा सोमवारी (ता. 26 ऑगस्ट) कोसळला आहे.

छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. सर्वच राजकीय पक्षाकडून सत्ताधारी भाजप (BJP) आणि महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना ‘सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलत आहे. पुतळा कोसळायला महायुतीचे सरकार जबाबदार आहे. या सरकारने महाराष्ट्राची माफी मागावी, किंबहुना राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे पाप या मंडळींनी केले आहे.

Ashish Shelar
Ranjitshinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; विजयदादांनी दिले हे उत्तर....

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती आणि दर्जेदार पुतळा पुन्हा त्या ठिकाणी उभारण्यात यावा. सर्व नियमांचे पालक करून तो उभारण्यात यावा. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडी सरकारनेच पूर्ण करावा, असे वक्तव्यही आमदार सतेज पाटील यांनी केले.

पुतळा कोसळण्याच्या घटनेवर कोणतेही राजकीय भाष्य मला करायचे नाही. पण, जी घटना घडली आहे, ती दुर्दैवी, वेदनादायक, क्लेषदायक आणि दुःखदायक आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय. आमच्या राजाचा कुठल्याही पद्धतीचा अपमान हा महाराष्ट्राचं काय, संपूर्ण हिंदुस्थान सहन करू शकत नाही.

Ashish Shelar
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : "माफी मागायची सोडून...", शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून काँग्रेस नेत्याचे PM मोदी अन् CM शिंदेंवर टीकास्र

या घटनेच्या मागे कोण आहे. कसं घडलं. का घडलं, यात दोषी कोण आहे. एफआरआय काय, चौकशी काय, या सर्व गोष्टी समोर येणार आहेत. मात्र, जी घटना घडली, कुठल्या कारणाने घडली. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो. पण या सर्वांतून पुन्हा महाराजांचा पुतळा उभा करण्यात येईल. आपला आभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू, याबाबत आम्ही कटिबद्ध असू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com