विदर्भ

समीर वानखेडे यांच्या मूळ गावातील कागदपत्रे काय सांगतात? : चुलत्याने सांगितली वस्तुस्थिती

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळ गाव हे वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे आहे

गजानन भोयर

वाशिम : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्विट केले होते. तुम्ही माझ्या मूळ गावी जाऊन खरी माहिती घ्या, असे वानखेडे यांनी सांगितले होते.

Samir Wankhede

वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा असून, या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. तुम्हाला खरी माहिती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. असे वानखेडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले होते.

समीर ज्ञानदेव वानखेडे यांच मुळ गाव हे वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे आहे. या गावात त्यांचे वडिलोपार्जित घर जमीन आहे. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून, सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जाती चे असल्याचे दिसून आले.

शंकरराव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल. मात्र, हे राजकिय आरोप आहेत. माझ्या भावाचे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तर यावेळी त्यांनी ज्ञानदेव वानखेडे यांच्या शाळेचा दाखलाच दिला. त्यामध्ये त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT