Devendra Fadanvis sarkarnama
विदर्भ

Samruddhi Mahamarg : फडणवीसांनी दाखवून दिलं, राज्याच्या 'समृद्धी'चे 'स्टेअरिंग' आपल्याच हाती..

Samruddhi Mahamarg : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबरला होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Samruddhi Mahamarg : शिंदे-फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'च्या पहिल्या टप्याचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आज (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले आहेत. (Samruddhi Mahamarg news update)

हे दोघेही सध्या रेंज रोव्हर कारने टेस्ट ड्राईव्ह करीत आहेत. फडणवीस गाडी चालवत असून शिंदे हे त्यांच्या बाजूला बसले आहेत. त्यामुळे राज्याचे 'स्टेअरिंग'हे फडणवीस यांच्या हातात असल्याचे दिसते. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री एमएसआरडीसी एमडी राधेश्याम मोपलवार, एमडी अनिल गायकवाड हे सोबत आहेत. मर्सिडीज बेन्झ कार फडणवीस चालवीत आहेत.

राज्याचा कारभार हा फडणवीस चालवीत असल्याची टीका विरोधक करीत आहेत, विरोधक टीका करतानाच "सरकारचे स्टेअरिंग एकनाथ शिंदेंच्या नाही, तर ते आपल्याच हाती आहे, हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे.

नागपूर ते शिर्डी पर्यंतचा प्रवास आज ते करीत आहेत. सायंकाळी पाच वाजता शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा ११ डिसेंबरला होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

समृध्दी महामार्गासोबतचं नागपूर मेट्रो रिच २ आणि रिच ३ चा उद्घाटन सोहळा देखील पार पडणार आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी करीत आहेत.

महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नागपूर (Nagpur)- मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी केली होती. राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे.

सध्या स्थितीत मुंबई ते नागपूर अंतर कापवयास जवळपास १४ तास लागतात. जवळपास ८१२ किमी हे अंतर आहे. जर समृद्धी महामार्ग झाल्यास अंतर ७०० किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाण्यास केवळ ४ तास लागणार. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येणार आहे. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एम.एस.आर.डि.सी काम पाहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT