Sana Khan Sarkarnama
विदर्भ

Sana Khan Murder Case : खटला चालवण्यासाठी मृतदेह आवश्‍यक, अन्यथा प्रकरण न्यायालयात टिकणार नाही !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Crime News : सना खानचा मृतदेह सापडणे हा आरोपींविरुद्ध खुनाचा खटला चालविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तिचा मृतदेह सापडल्याशिवाय हे प्रकरण न्यायालयात तग धरणार नाही, असा कयास कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने या पैलूचे महत्त्व सांगून फौजदारी कारवाईत पुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले. (The case will not stand up in court unless the body is found)

तीन आठवड्यांपासून पोलिस सना खान यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. पण तिचा मृतदेह सापडलेला नाही. त्यामुळे जबलपूरला शोध मोहिमेसाठी गेलेले नागपूर पोलिसांचे पथक नागपूरला परतले असल्याची माहिती आहे.

सना खान दोन ऑगस्टला जबलपूरला अमित शाहू याच्या भेटीसाठी रवाना झाल्या होत्या. त्यानंतर सकाळी मुलाशी बोलून दुपारी त्यांचा फोन बंद झाला होता. त्यानंतर सना यांच्या आईने मानकापूर पोलिसांत बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. ११ ऑगस्टला अमित शाहूसह रमेश सिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान आरोपींनी पोलिसांना सना यांचा मृतदेह हा हिरण नदीत फेकल्याची माहिती दिली होती. तेव्हा पासून सतत पोलिस पथक मृतदेह शोधत आहेत. यादरम्यान पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. याशिवाय ३०० किलोमीटर दूर एका विहिरीत सापडलेला संशयित मृतदेहही ताब्यात घेतला.

विशेष म्हणजे, पोलिसांना सहआरोपी धर्मेंद्र सिंग याने मृतदेह नदीत फेकून देत, बॅग तिथेच ठेवल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी बॅग आणि एक मोबाईलही जप्त केला. दुसरीकडे तीन आठवड्यांपासून पोलिसांकडून हिरण आणि नर्मदा नद्यांच्या आसपासच्या भागात शोध सुरू आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीवर तपास सुरू केले. मात्र, पोलिसांना मृतदेह शोधण्यात यश आले नाही.

सना खान यांचा मृतदेह हा नदीत फेकल्याचे आरोपींनी सांगताच, पोलिसांनी मध्यप्रदेश (Madhya Pradesh) प्रशासनाच्या मदतीने नर्मदा नदीवरील धरणाचे पाणीही थांबविले. याशिवाय राज्य (Maharashtra) आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने नदीत चार ते पाच किलोमीटरपर्यंत मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, त्यानंतरही पोलिसांच्या हाती अपयश आले आहे.

सध्या मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ अमित साहू, रमेश सिंग, धर्मेंद्र यादव, रब्बू चाचा ऊर्फ रविशंकर यादव आणि कमलेश पटेल हे पोलिस (Police) कोठडीत आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. शोध मोहिमेचा अयशस्वी निष्कर्ष तपासाला धक्का देणारा आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT