Sanjay Meshram mallikarjun kharge  sarkarnama
विदर्भ

Sanjay Meshram : पहिल्यांदा विजय पण काँग्रेसची घेतली दखल, संजय मेश्राम पुन्हा आले चर्चेत!

Sanjay Meshram Congress Legislature Party Whip :विधानसभेचा निकाल जाहीर होताच राजू आणि सुधीर पारवे यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला. संजय मेश्राम हे जायंट किलर ठरले होते.

Rajesh Charpe

Sanjay Meshram News: उमेरड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार बंधू सुधीर आणि राजू पारवे यांची मक्तेदारी संपवून निवडूण आलेले आमदार संजय मेश्राम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधानसभेच्या कामकाजाचा अवघ्या तीन महिन्यांचा अनुभव असताना त्यांची काँग्रेसने प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे काँग्रेस वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर येथे पारवे यांचेच वर्चस्व होते. भाजपचे सुधीर पारवे येथून दोन वेळा निवडूण आले होते. त्यानंतर काँग्रेसचे राजू पारवे यांनी त्यांच्यावर मात केली. राजू पारवे यांनी महायुतीकडून रामेटक लोकसभा मतदरासंघातून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजू पारवेंनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे सुधीर पारवे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजपनेही येथे उमेदवारी देताना शेवटपर्यंत ताणून धरले होते. त्यामुळे राजू आणि सुधीर पारवे दोघेही अस्वस्थ झाले होते. दोघांनाही भाजपने शब्द दिला होता. शेवटी जोखीम नको म्हणून वेळेवर भाजपात आलेल्या राजू पारवे यांच्याऐवजी सुधीर पारवे यांनी तिकीट देण्यात आले होते.

दोन्ही पारवे बंधू एकाच पक्षाच्या छताखाली आल्याने भाजपचा उमेदवार आरामात विजय होईल, असे राजकीय आराखडे बांधल्या जात होते.भाजपमधून येथे बंडखोरीसुद्धा झाली होती. त्यामुळे भाजप आणि बंडखोर यांच्यातच खरी लढाई असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा सर्वत्र बोलबाला होता. महायुतीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतीला होती.

जायंट किलर मेश्राम

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची साथ असल्याने संजय मेश्राम यांच्याकडे कोणी स्पर्धक बघतच नव्हते. मात्र विधानसभेचा निकाल जाहीर होताच पारवे यांच्यासह सर्वच भाजपच नेत्यांना मोठा धक्का बसला. संजय मेश्राम हे जायंट किलर ठरले.

काँग्रेसशी एकनिष्ठ

संजय मेश्राम यांनी यापूर्वी 2014 ची निवडणूक लढली होती. ते पराभूत झाल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने राजू पारवे यांना मैदानात उतरवले. ते जिंकूणसुद्धा आले. त्यांनी महायुतीत जाण्याचा आत्मघाती निर्णय घेतला आणि संजय मेश्राम यांचे नशिब फळफळले. आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून आपण प्रथमच निवडूण आलो असले तरी नवखे नसल्याचे सर्वांना दाखवून दिले.

राष्ट्रीय पातळीवर दखल

संजय मेश्राम उच्चशिक्षित आहेत. अभियंते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी डॉक्टर आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते रोटरीचे गव्हर्नर होते. या माध्यमातून त्यांच्या समाजसेवेला प्रारंभ झाला. नंतर काँग्रेसमध्ये आले. ते नागपूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT