MLA Babanrao Lonikar News : राजकारणातून निवृत्ती की प्रमोशन हवयं ? बबनराव लोणीकरांच्या गुगलीने समर्थकांची दांडी गुल!

BJP MLA Babnarav Lonikar signals retirement and indicates he will not contest in the upcoming assembly elections. : यापुढे मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही', असे लोणीकर यांनी सांगून टाकले. नेता निवृत्त होणार हा धक्का त्यांच्या समर्थकांना बसण्याआधीच लोणीकरांनी दुसरा धक्का दिला.
MLA Babanrao Lonikar News
MLA Babanrao Lonikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics : भाजपाचे परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज आपल्या वाढदिवशीच केलेल्या एका विधानाने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'मी आता साठ वर्षांचा झालो आहे, आता रिटायरमेट घ्यायला हवी. यापुढे मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही', असे लोणीकर यांनी सांगून टाकले. नेता निवृत्त होणार हा धक्का त्यांच्या समर्थकांना बसण्याआधीच लोणीकरांनी दुसरा धक्का दिला.

तो म्हणजे 'वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिला अन् साधु-संताचे आशीर्वाद असले तर लोकसभा लढवण्याची आपली इच्छा'असल्याचे लोणीकर म्हणाले. वाढदिवशी रिटायरमेंटची भाषा आणि दुसरीकडे लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर करणे म्हणजे नेमंक (Babanrao Lonikar) लोणीकरांना निवृत्त व्हायचंय की मग लोकसभा लढवून प्रमोशन घ्यायचे आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभेच्या परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आणि 2014-19 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात राज्याचे पाणीपुरवठा व जालन्याचे पालकमंत्री राहिलेल्या बबनराव लोणीकर यांची मराठवाडा आणि राज्याच्या राजकारणाला चांगलीच ओळख आहे. (BJP) आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे लोणीकर अनेकदा अडचणीतही सापडले होते.

MLA Babanrao Lonikar News
Babanrao Lonikar Birthday: समितीचे सभापती ते केंद्रीय मंत्री; बबनराव लोणीकर...

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोणीकर परतूरमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. संपूर्ण जालना जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आल्यानंतरही मंत्रीपदाने हुलकावणी दिली. लोणीकर यांना मंत्री पदाची अपेक्षा होती, पण तसे काही घडले नाही. विधीमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्षपद जाहीर झाले, त्यात देवेंद्र फडणवीस यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. जालन्यातून आमदार संतोष दानवे, नारायण कूचे यांची वर्णी अध्यक्षपदावर लागली.

MLA Babanrao Lonikar News
Jalna Political News : जालन्यात भाऊ, दादा की सेठ ? स्थानिक स्वराज्य संस्थेतील वर्चस्वासाठी कुरघोडीचे राजकारण!

परंतु प्रदीर्घ राजकीय अनुभव, पक्षाशी एकनिष्ठ असूनही लोणीकर यांना नव्या महायुती सरकारमध्ये मात्र कुठलीच संधी मिळाली नाही. जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडल्यामुळेच कदाचित लोणीकर यांनी निवृत्तीचे संकेत दिले. मात्र त्यांच्या या बुचकळ्यात टाकणाऱ्या संकेताने सगळेच चकित झाले. विधानसभा लढवणार नाही असे एकीकडे लोणीकर सांगतात, दुसरीकडे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे वाढदिवशीच लोणीकरांनी ही गुगली टाकल्याची चर्चा आता होत आहे.

MLA Babanrao Lonikar News
Raosaheb Danve News : थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय; रावसाहेब दानवे म्हणतात, पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये लोकसभा लढवणार!

लोकसभा जालना की परभणी ?

बबनराव लोणीकर ज्या परतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो, लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचा भाग आहे. 2024 मध्ये लोणीकरांकडून परभणीतून लढण्याची तयारी सुरू होती. परंतू महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने व नंतर राजकीय वाटाघाटीतून तो रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाल्याने लोणीकरांना शांत राहावे लागले. आता लोणीकरांनी पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मग नेमकं ते परभणीतून लढणार की जालना? मतदारसंघातून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

MLA Babanrao Lonikar News
BJP Vs Shivens-Ncp : आदळआपट करा, नाराज व्हा; भाजपमागे फरफटत जाण्याशिवाय शिंदे-अजितदादांकडे पर्याय नाही!

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भाजपाचे सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. इथे काँग्रेसचे कल्याण काळे निवडून आले. दानवे यांचा पराभव झाल्यामुळे 2029 मध्ये तरी आपल्या नावाचा विचार व्हावा, या हेतूने तर लोणीकरांनी लोकसभा लढवण्याबाबतचे विधान केले नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी आपण विधानसभा, परिषद, राज्यसभेवर जाणार नाही, पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये लोकसभा लढवू असे म्हटले होते. त्यामुळे आता पक्ष नेमका पुढच्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी कोणाचा विचार करणार? हे पाहण्यासाठी चार वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com