Amit Shah, Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

Sanjay Raut : राजेंद्र शिंगणेंवरून संजय राऊतांचा अमित शाह, देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; म्हणाले...

Rajendra Shingane : शरद पवार आणि शिवसेना पक्षाचे आमदार सोडून गेलेले आहे. त्यामुळे दोघांची स्थिती सारखीच आहे. त्यामागे जोर जबरदस्ती, धमक्या, खोके यांचा संगम आहे.

सरकारनामा ब्यरो

Maharashtra Political News : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी राज्यातील नेत्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. आपले मतदारसंघ राखून तेथे निवडून येण्यासाठी काही नेत्यांनी वेगवेळगळ्या पद्धतीने मतदारांना चुचकारण्याचे काम सुरू केले आहे.

यातूनच अजित पवार गटातील सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आपण ज्येष्ठ नेते शरद पवारांना नेते मानतो, असे विधान केले. तर दबावातून महायुतीसोबत असल्याचे विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी-शाह, फडणवीस यांच्या समाचार घेतला.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेना तर वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. दोन्ही पक्षातील 40 हून अधिक आमदारांनी बंडाला साथ दिली. त्याला केंद्रीय यंत्रणांचा दाबावाचे कारण असल्याचे संजय राऊत Sanjay Raut यांनी आरोप केला. ते म्हणाले शरद पवार आणि शिवसेना पक्षाचे आमदार सोडून गेलेले आहे. त्यामुळे दोघांची स्थिती सारखीच आहे. त्यामागे जोर जबरदस्ती, धमक्या, खोके यांचा संगम आहे.

सोडून गेलेल्या आमदार, खासदारांमागे ईडी, सीबीआय, आयटी, पोलिसांचा दबाव होता. या यत्रणांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून खटले सुरू केले होते. या यंत्रणांवर केंद्रीय मंत्री आमित शाह, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचा दाबाव आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यांच्या पीएला अटक करण्यात आली होती, याकडेही राऊतांनी लक्ष वेधले.

या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही

संजय राऊत म्हणाले, देशात आणि राज्यात केवळ सरकारविरोधी भूमिका घेतली म्हणून अनेकांना तुरुंगवारी करावी लागली. त्यात मी, अनिल देशमुख यांचाही समावेश होता. नागपूरमळेच आम्ही दोघांना तुरुंगात राहावे लागेल. त्यामुळे देश आणि राज्यातील हा दबाबचा मुद्दा या सरकारला गाडल्याशिवाय कायम प्रचारात राहणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. आमची सत्ता आल्यावर आम्ही हे दिवस काळे म्हणून साजरे करू, असेही राऊतांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT