Sanjaya Raut : राज्यातील निवडणूक लांबणीवर; संजय राऊतांनी कारण सांगितलं

Nagpur Political News : वन नेशन आणि वन इलेक्शन हा पंतप्रधान मोदींचा नारा आहे. त्यानुसार चारही राज्यांच्या निवडणुका एकत्र व्हायला पाहिजे.
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आता देशातील महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मिर आणि झारखंड या राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. निवडणूक आयोगाने मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. तर राज्यात पावसाळ्यामुळे तयारीला वेळ लागणार असल्याचे कारण दिले.

यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला राज्यात खेळ करायचा असल्याने निवडणुका लांबणीवर टाकल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत Sanjay Raut नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील निवडणुका नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. त्यावर छेडले असता राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कोण सांगणारे. आता निवडणूक आयोगालाही खोके दिले का, असा प्रश्न उपस्थित आहे.

वन नेशन आणि वन इलेक्शन हा पंतप्रधान मोदींचा नारा आहे. त्यानुसार चारही राज्यांच्या निवडणुका एकत्र व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपच्या हेतूबाबत राऊतांनी शंका व्यक्त केली.

झारखंडमध्ये भाजपला निवडणुकीपूर्वी गडबड करायची आहे. सोरेनला हटविण्याचे त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विविध मार्गांनी त्यांच्या अडचणी वाढवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती येत आहे. मुख्यमंत्री सोरेन यांना हटवण्यासाठी भाजप सर्वोतेपरी प्रयत्न करताना दिसत आहे, असा राऊतांनी घणाघात केला.

महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करायची आहे, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राज्यात गडबड करण्यासाठी त्यांना आणखी वेळ लागत आहे. त्यासाठीच त्यांनी निवडणुका एकत्र घेतल्या नाही. महाराष्ट्रातील Maharashtra त्रिकुटला खेळ करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Bhaskar Jadhav : आमदार जाधवांचा वेगळाच राजकीय मूड, पुत्रप्रेमाखातर घेणार मोठा निर्णय

बहिणींना धमकीचा बोनस

राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचा मोठा बोलबाला सुरू आहे. महायुतीचे नेते या योजनेवर भर देऊन सध्या प्रचार करताना दिसत आहेत. तसेच ही योजना कायम सुरू राहण्यासाठी महायुतीलाच मतदान करा, असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. यावर राऊतांनी आपल्या शेलक्या शब्दांनी महायुतीचा समाचार घेतला. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जामा होत आहेत. आता मत दिले नाहीतर त्या दीड हजार रुपयांवर धमकीचा बोनसही दिला जात आहे, असे राऊत यांनी म्हटले.

sanjay raut |eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Parbhani Assembly Election: विधानसभेला परभणी जिल्ह्यावर कोण वर्चस्व गाजवणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com