Harshvardhan Sapkal, Sanjay Savkare Sarkarnama
विदर्भ

Sanjay Savkare: शेतकऱ्यांचे अश्रु पुसायला गेले की पिकनिकला? नुकसानग्रस्त भागात मंत्र्यांचं 'फोटोसेशन'

Sanjay Savkare visits Lonar Lake Opposition slams Photo Session Politics:अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा तालुक्यातील किती नुकसान झाले याची माहिती मंत्रीमहोदयांनी घेतली. त्यानंतर लगेचच ते जगप्रसिध्द लोणार सरोवर बघण्यासाठी रवाना झाले.

Mangesh Mahale

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात असताना जिल्हाधिकारी नवरात्र उत्सवात थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राज्याच्या एका मंत्रीमहोदयांचा फोटोवरुन विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मंत्र्यांना असे 'फोटोसेशन'करण्याचा मोह का होतो? असा प्रश्न सध्या सोशल मीडियावरुन विचारण्यात येत आहे.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी लोणार सरोवराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सरोवराची पाहणी केली असली तरी त्यांनी फोटोसेशनवर भर दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या भेटीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संजय सावकारे हे दोन दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सावकारे यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा तालुक्यातील किती नुकसान झाले याची माहिती मंत्रीमहोदयांनी घेतली. त्यानंतर लगेचच ते जगप्रसिध्द लोणार सरोवर बघण्यासाठी रवाना झाले.

'लोणार'चे निसर्ग सौंदर्य पाहून अनेक जणांना या सरोवर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. तसाच मोह सावकारे यांना झाला अन् ते विरोधकांच्या निशाण्यावर आले. त्यांच्या या फोटोवरुन विरोधकांना टीकेसाठी आयते कोलीत मिळाले आहे. लोणार ला भेट दिल्यानंतर सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस योजना न मांडता फक्त त्यांनी फोटोसेशन केले असा विरोधकांचा आरोप आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हाप्रमख जालिंदर बुधवत यांनी या फोटोवर टीका केली आहे. "शेतकऱ्यांची सांत्वना करण्याचे सोडून मंत्री सावकारे पिकनिकसाठी गेले ही लाजीरवाणी बाब आहे. बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. जिल्ह्याला दोन पालकमंत्री असून त्यांना बळीराजाच्या वेदना समजत नाहीत. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी," असे बुधवत यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री असलेले संजय सावकारे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी 'लोणार'येथे जाऊन फोटो सेशन करुन त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. सावकारे यांनी हसत हसत काढलेल्या फोटोवरून दिसून येत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजप सर्मथक म्हणतात..

संजय सावकारे हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोणार सरोवर बघण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा फोटो काढतो त्यामुळे सावकारे यांनी फोटो काढला यात काहीही चुकीचे नाही.

लोणार सरोवराचे महत्त्व

  • जगातील दुर्मिळ उल्कापात सरोवरांपैकी एक.

  • युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता.

  • संरक्षण, स्वच्छता आणि पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उभारणीची गरज.

कीर्ती पुजार नाचगाण्यात गुंतले

राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार हे नवरात्र उत्सवात नाचगाण्यात गुंतले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर सर्वत्र त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याचे पाहून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी ‘नाचगाण्यात व्यस्त असलेल्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव निर्णय घेतील’ असे सांगत कारवाई न करता हात झटकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT