Gunratna Sadavarte Sarkarnama
विदर्भ

Sanjay Raut : ‘संजूबाबा फेल’, स्वतंत्र विदर्भ राज्य डंके की चोट पे घेऊ...

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्र राज्यासाठी सकारात्मक आहेत.

दिनकर गुल्हाने

Yavatmal District News : छोट्या राज्यांची निर्मिती ही कष्टकऱ्यांसाठी लाभदायक आहे. विदर्भात खनिज आणि वन संपदा विपुल आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे, अशी कष्टकऱ्यांची मागणी आहे. राज्यात आपले सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)स्वतंत्र राज्यासाठी सकारात्मक आहेत. विदर्भ (Vidarbha) राज्य निर्मितीसाठी कळकळीची विनंती आहे. आम्ही कष्टकरी डंके की चोट पे विदर्भ राज्य घेऊ, असा आत्मविश्वास एसटी कष्टकरी जनसंघाचे संस्थापक ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद (Pusad) एसटी बसस्थानकातील एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या फलकाचे अनावरण ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी आगारात झालेल्या कामगारांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष व त्यांच्या अर्धांगिनी ॲड. जयश्री पाटील होत्या. पुसद येथील एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या वतीने फटाके फोडून त्यांचे दणकेबाज स्वागत करण्यात आले.

विदर्भ राज्यासोबतच पुसद जिल्हा व्हावा, अशी मागणीही ॲड. गुणरत्न यांनी केली. स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यासाठी आम्ही कष्टकरी सर्व एकत्रित आहोत, असे सांगून विरोधी पक्षाचे खरे पुढारी असतील तर त्यांनी हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचे विधेयक आणावे,असे आवाहन त्यांनी केले. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी टाळ्या वाजवून 'विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. आम्ही गलिच्छ राजकारण करत नाही. कुणी अन्याय केला तर त्याला संविधानाने उत्तर देऊ, असे ठासून सांगितले. एसटी कष्टकरी जनसंघ ही संघटना जातीपातीच्या पलीकडे असून यात ३३ हजार मराठा कष्टकरी आहेत. यात सर्व जाती-धर्मांचे लोक प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात या संघटनेने आत्मविश्वास जागविला. एसटी कर्मचाऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवू, असे त्यांनी यावेळी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस मिळवून दिला. एसटीच्या विलीनीकरणासाठी लढा दिला, असे सांगून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर 'संजूबाबा फेल' अशा शब्दात टीकास्त्र सोडले.

ॲड. जयश्री पाटील यांनी एसटी विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असून आवश्यक डेटा संकलित करण्यात येत असल्याचे सांगितले.यावर अभ्यास सुरू असून विलीनीकरणाची फाईल पुढे सरकली आहे. आपले मायबाप सरकार आहे. थोडा विलंब होईल, पण न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आपले सरकार आहे, त्रास देऊ नये, थोडा संयम ठेवावा,असे आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले. एस टी महामंडळाच्या मालकीच्या जागा इतर विभागांना देण्याचे कुंभार रचण्यात आले. मात्र तसे होऊ देणार नाही. या जागेवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी कॉलनी उभारू, असा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. पुसद संघटनेचे अध्यक्ष रमेश राठोड, सचिव सुभाष कनाके यांनी सदावर्ते दांपत्याचे स्वागत केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT