Gunratna Sadavarte Latest News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीसह शिवप्रेमी संघटनांनी कोश्यारी यांची राज्यपालपदावरुन हटवण्याची मागणी देखील जोर धरु लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यात देखील मंगळवारी (दि.12) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण आता याच मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी गंभीर आरोप करत मोठी मागणी केली आहे.
पुण्यात राज्यपालांविरोधात डेक्कन ते लालमहालापर्यंत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून लालमहालापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या मोर्चात भाजप व मनसे सहभागी झाले नव्हते. पण आता याच मोर्चावरुन वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यातील मूक मोर्चावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. सदावर्ते म्हणाले, पुण्यात आयोजित करण्यात आलेला मूक मोर्चा हा बेकायदेशीर आहे. तसेच या मोर्चात सहभागी झालेले खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक करावी.
''नुपूर शर्मांसारखीच कारवाई राज्यपालांविरोधात करण्यात यावी..''
खासदार उदयनराजे म्हणाले, साडेतीनशे वर्षांनंतरही जनमानसांतील शिवाजी महाराजांबद्दलचा आदर कमी झाला नाही . किंबहुना तो दिवसेंदिवस वाढत आहे. महाराजांपुढं पक्ष दुय्यम आहे. पण, सध्या काही तुटपुंजे, फुटकळ विकृत लोकं अनावश्यक विधान करताहेत. यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. मात्र, नुपूर शर्मांच्याबाबतीत घेतलेल्या डिसीप्लिनरी अॅक्शनसारखीच कारवाई राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात घेण्यात यावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.