Nitin Raut
Nitin Raut  
विदर्भ

सरसंघचालक हेडगेवार यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली: नितीन राऊतांचा दावा

सरकारनामा ब्युुरो

यवतमाळ : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी नावाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. हा वाद ताजा असतानाच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलेल्या दाव्यामुळे आणखी एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतमाळच्या वणी येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलताना त्यांनी थेट संरसंघचाल हेगडेवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाष चंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले. मात्र, ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने हेगडेवार यांनी भेट नाकारली. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला. यांनीच जाती जाती-जातील, धर्मा-धर्मात भांडण तंटे उभे केले आणि आता हेच गुलाम आज आपल्याला शिकवायला निघालेत. सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे, असेही मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

मंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी भाष्य केलं आहे. 'सरसंघचालक हेडगेवार यांच्यासंबंधी काही बोलण्यापूर्वी नितीन राऊत यांनी अभ्यास करावा, नितीन राऊत हेदेखील नागपूरचे रहिवासी आहे. काँग्रेसने देशाला खरा इतिहास माहिती होऊ दिला नाही, अशी टीका भुतडा केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती

23 जानेवारी 1897 रोजी बंगाल विभागात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. नेताजी यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि तर आई गृहिणी होत्या. कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते कोलकता येथे गेले. कोलकता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.

यानंतर भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी नेताजींच्या पालकांनी त्यांना इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT