बडा नेता बाहेर पडताच काँग्रेसनं अविनाश पांडेंवर सोपवली मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
Avinash Pandey and Rahul Gandhi
Avinash Pandey and Rahul Gandhi Sarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) भाजपमध्ये (BJP) दाखल झाले आहेत. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला आहे. सिंह यांनी काँग्रेस सोडताच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे.

सिंह यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची आणि झारखंडच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. आता त्यांनी काँग्रेस सोडून भाजपशी हातमिळवणी केली आहे. यामुळे अविनाश पांडे यांची सरचिटचणीस-प्रभारी झारखंड ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांडे हे मूळचे नागपूरमधील आहेत. पांडे हे याआधी युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. याचबरोबर ते विधानपरिषदेचे सदस्यही होते. तसेच, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उद्योगपती राहुल बजाज यांनी 2008 मध्ये राज्यसभा निवडणुकीत पांडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2010 मध्ये ते बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांच्याकडे आधी राजस्थानचीही जबाबदारी होती.

Avinash Pandey and Rahul Gandhi
माजी सरपंच पक्षात दाखल होताच मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आम्हीच पुन्हा येणार!

काँग्रेस नुकतीच तीस जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी केंद्रीय मंत्री सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सिंह हे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सिंह यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. (RPN Singh joins BJP)

Avinash Pandey and Rahul Gandhi
पक्ष सोडताच माजी केंद्रीय मंत्र्याला काँग्रेसनं ठरवलं पळपुटा!

सिंह हे भाजपमध्ये दाखल झाले असून, त्यांचा सामना भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले मातब्बर ओबीसी नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याशी होण्याची शक्यता आहे. यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ते पडरौना मतदारसंघातून मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. या मतदारसंघात मौर्य हे विद्यमान आमदार आहेत. मौर्य यांच्या विरोधात लढण्यासाठी बलाढ्य नेत्याचा शोध भाजपकडून सुरू होता. अखेर सिंह यांच्या रुपाने हा नेता मिळाला आहे. सिंह आणि मौर्य या दोघांनीही या मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक नोंदवली आहे. (RPN Singh News Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com