Satej Patil
Satej Patil Sarkarnama
विदर्भ

Satej Patil : विधान परिषदेत गाजले, पिंपळखुटी चेकपोस्ट मिर्झांचा प्रश्‍न; अन् सतेज पाटील आक्रमक !

सरकारनामा ब्यूरो

Pimpalkhuti Checkpost on the border of Maharashtra and Telangana states : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी येथे राज्य परिवहन विभागाचे चेक पोस्ट आहेत. येथे अधिकाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी आज सभागृहात उपस्थित केला. यावरून सभागृहात वातावरण तापले होते.

मोटर वाहन निरीक्षक राहुल जाधव आणि संदीप उडीवार चेक पोस्टवर वसुली करतात, लोकांना त्रास देतात, वाहनचालकांकडून बळजबरीने पैसे वसुलतात आणि त्यांनी मारपीटही केली असल्याचा आरोप वजाहत मिर्झा यांनी केला आणि सरकार कारवाई कधी करणार असा प्रश्‍न उपस्थित केला. सतेज पाटील यांनीही या मुद्द्यावर बोलत एकाच अधिकाऱ्याकडे चार-चार जिल्ह्यांचा प्रभार कसा, हा प्रश्‍न केला.

यावर बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले, वर्तमान पत्रात बातमी आली होती. त्यानंतर माहिती घेतली असता पिंपळखुटी सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक आळीपाळीने कार्यरत असतात. तेथे काटे बसवले आहेत अति भार वाहतूक (ओव्हरलोडींग) करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ मध्ये ५२,१८९ दोषी वाहने आढळली, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ मध्येही दोषी वाहने आढळली. एप्रिल २०२२ ते आतापर्यंत ८२,४२३ वाहने दोषी आढळली. या सर्व वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

ओव्हरलोड वाहनांसंदर्भात २०२० ते २०२१ मध्ये २,१७५ वाहने. २०२१ ते २०२२ मध्ये २,१०७ तर २०२२ ते आत्तापर्यंत १,२८९ वाहने ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली आहे. मारहाणीची जी सीसीटीव्ही क्ल्पि व्हायरल झाल्याची माहिती डॉ. वजाहत मिर्झा यांनी दिली, ती क्लिप त्यांनी उपलब्ध करून द्यावी. त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले. याचा अर्थ प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकाऱ्याच्या अहवालात त्या क्लिपचा उल्लेख नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा का, असा प्रश्‍न सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT