Satej Patil
Satej PatilSarkarnama

Satej Patil News : आमदार सतेज पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने ताकद लावलेली असूनही तो मतदारसंघ त्यांनी पक्षाला एकहाती जिंकून दिला होता.

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक एकहाती जिंकून देणारे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज पाटील (satej Patil) यांच्यावर काँग्रेसने (Congress) मोठी जबाबदारी दिली आहे. विधान परिषदेतील गटनेतेपद पक्षाने सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवले आहे. (Appointment of Satej Patil as Congress Legislative Council group leader)

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज (ता. २ मार्च) सभागृहात बंटी पाटील यांच्या निवडीची घोषणा केली. पाटील यांच्या निवडीने एका तरुण नेत्याला पक्षाने काम करण्यास वाव दिला आहे.

Satej Patil
Kasba By Election Result : गिरीश बापट सक्रीय राजकारणातून बाजूला होताच भाजपचा बुरूज ढासळला

सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. पक्षवाढीबरोबरच ‘गोकुळ’सारखा राज्यात नावाजलेला मोठा दूध संघ काँग्रेसच्या अखत्यारित आणला आहे. याशिवाय विधानसभेला कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघातून पुतण्याला निवडणुकीच्या मैदानात उतरवून महाडिाकांना पराभूत करत काँग्रेसला जागा जिंकून दिली हेाती. तसेच, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने ताकद लावलेली असूनही तो मतदारसंघ त्यांनी पक्षाला एकहाती जिंकून दिला होता. त्यामुळे त्यांचे पक्षात वजन वाढल होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती.

Satej Patil
Kasba By Election Result : आम्ही भाजपचा दुसरा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केला : धंगेकरांच्या विजयानंतर थोरातांची प्रतिक्रिया

सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच २०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्य मंत्री, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

Satej Patil Appointment  Letter
Satej Patil Appointment LetterCongress

या निवडीनंतर सतेज पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार मानतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com